अक्कलकोट तालुक्यात वाळू टेंडर तात्काळ सुरु करा : अविनाश मडिखांबे

Avinash Madikhambe

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट तालुका हा महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील सीमावर्ती भागात असुन याठिकाणी रोजगाराचे कोणतेही मोठे साधन उपलब्ध नाही. त्यामुळे सध्या अक्कलकोट शहर व तालुक्यातील मंजुर असलेल्या रमाई आवास योजना, प्रधानमंत्री घरकुल योजना व अन्य घरगुती घराचे बांधकाम सुरू असुन सदर बांधकाम गेल्या दहा महिन्यापासून वाळु अभावी संपूर्ण पुर्णपणे बंद झाले आहे. त्यामुळे त्यावरती उपजिवीका असलेल्या बांधकाम मिस्त्री,व बांधकाम मजुर यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी या विषयावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्या नेतृत्वाखाली अनेकदा निवेदन, मोर्चे, आंदोलने, पाठपुरावा करुन सुद्धा अद्याप शासनाने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाहीत. वाळू उपलब्ध होत नसल्याने अनेक घर बेघर झाले आहेत. त्यांना हाताला काम नाही मिस्त्री व रोजंदारी वर बांधकाम काम करणार्या मजूरावर उपासमारीची वेळ आली आहे व अनेक घरचे बांधकाम अर्धवट स्थितीत आहेत.
तरी अक्कलकोट शहर व तालुक्यासाठी मा. तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे याविषयी पाठपुरावा करून अर्धवट असलेल्या घराचे बांधकाम पुर्ण करण्यासाठी लवकरात लवकर वाळु उपलब्ध होण्यासाठी नदी व तलावाकाठीतील वाळूचा लिलाव काढण्यात यावा अन्यथा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी रोजी रिपाई आठवले गटाच्या वतीने अक्कलकोट तालुक्यातील सर्व बांधकाम व्यावसायिक, मिस्ञी तसेच बांधकाम मजूरांना घेऊन नवीन तहसिल कार्यालय येथे आमरण उपोषण करण्याचा तीव्र इशारा रिपाईंचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी दिला आहे.

About Author