श्रेया राठोड मिळाला लातूरच्या जिल्हाधिकार्यांना फेटा बांधण्याचा मान

। नाविंदगी : प्रतिनिधी
लातूर येथे दि.9 जानेवारी रोजी एका खासगी कार्यक्रमात प्रियदर्शनी कोचींग क्लासेस उद्घाटन प्रसंगी लातूरचे जिल्हाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी नाविंदगीची कुमारी श्रेया अनिल राठोड ही इयत्ता 5 वी मध्ये सरस्वती माध्यमिक विद्यालय येथे शिकते आहे. या कार्यक्रमात श्रेयाने जिल्हाधिकारी यांना फेटा बांधले. जिल्हाधिकार्यांनी श्रेयाला घरी बोलावून ‘भारतीय संविधान’ हे पुस्तक भेट वस्तू म्हणून दिले. तसेच प्रत्येक मुलीनी श्रेया सारखे कला गुण जोपासले पाहिजे असे सांगितले. याप्रसंगी कोचींग क्लासेसचे संचालक सुनिल गायकवाड, प्रा.कांबळे, श्रेयाचे वडिल अनिल राठोड उपस्थित होते.