आदर्श व्यक्तिमत्वांचे स्मरण प्रेरणादायी : उमेश पाटील

Hannur

। चपळगाव : प्रतिनिधी
समाजातील प्रत्येक घटकांसाठी धडपडणारे लोक दुर्मिळ होत चालले आहेत. मात्र कोणत्याही अपेक्षेविना सेवा करणारे लोक आदर्श असतात.यापैकीच स्व.काशिनाथ भरमशेट्टी हे होते. त्यांनी आपल्या हयातीत निस्वार्थपणे समाजसेवा केली. अशा आदर्श माणसांचे स्मरण हा समाजासाठी प्रेरणादायी ठरते, असे मत उद्योजक उमेश पाटील यांनी व्यक्त केले.
स्वामी समर्थ सहकारी कारखान्याचे दिवंगत व्हा.चेअरमन काशिनाथ भरमशेट्टी यांच्या चौथ्या पूण्यतिथीनिमीत्त हन्नुर येथे रक्तदान शिबीराच्या उदघाटन समारंभाप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक उमेश पाटील होते. तर व्यासपीठावर पं.स.माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे, माजी उपसभापती सिध्दार्थ गायकवाड, संयोजक विश्वनाथ भरमशेट्टी, डॉ.नेहा भरमशेट्टी, क्रांती दर्गोपाटील, राजकुमार भरमशेट्टी, धानप्पा हंडगे, हमीद पिरजादे, बसवराज बाणेगांव, सिद्धाराम भंडारकवठे, मुलुकसो सगरी, दिलीप बिराजदार, महेश पाटील, दिलीप काजळे, राजशेखर मसुती, अभूजर पटेल आदी उपस्थित होते.
प्रारंभी कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते स्व.काशिनाथ भरमशेट्टी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तदनंतर रक्तदान शिबीराचे उदघाटन फीत कापून करण्यात आले. पूढे बोलताना उमेश पाटील म्हणाले की, स्व.काशिनाथ भरमशेट्टी यांनी संपूर्ण आयुष्यात राजकारण केले. मात्र राजकारणातुन त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी झटण्याचा ध्यास घेतला होता. अशी माणसे दुर्मिळ ठरत आहेत. समाजाच्या उन्नतीसाठी अशा माणसांसारखी हस्ती प्रत्येक घरात जन्माला येणे ही काळाची गरज बनल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बाळासाहेब मोरे, वैभव भरमशेट्टी यांनीही मनोगत व्यक्त करताना स्व.भरमशेट्टी यांच्या आठवणींना उजाळा दिला.
याप्रसंगी घेतलेल्या रक्तदान शिबिरात 108 जणांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्यांना के.बी.प्रतिष्ठानकडून भेटवस्तु देण्यातआले. यावेळी जयहिंद शुगर्सचे मार्गदर्शक बब्रुवान माने देशमुख, बाबू कराळे, बाळासाहेब जगताप, प्रा.निलेश भरमशेट्टी, चंद्रकांत जंगले गुरूजी, नरेंद्र जंगले, चंद्रकांत रोट्टे, चंद्रकांत सैदे, अप्पाशा हताळे, बसवणप्पा सुतार, विठ्ठल मोकाशी, गोटू मंगरूळे, विश्वनाथ भोसले, ईरण्णा पारतनाळे, शैलेश पाटील, चंदू कस्तुरे, प्रकाश बिराजदार, पकु बुगडे, औदूंबर जाधव, मलप्पा भरमशेट्टी, विठ्ठल भरमशेट्टी, योगीराज भरमशेट्टी, चंद्रमणी बाळशंकर, कपिल बंदिछोडे, निलप्पा घोडके, एन.पी.पाटील, लक्ष्मण बिडवे, तिपण्णा हेगडे, विश्वनाथ भरमशेट्टी, सिध्दाराम मड्डी यांच्यासह चपळगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल बिडवे, विश्वनाथ बिराजदार, निरंजन हेगडे, शिवा गवळी, सिध्दप्पा पुजारी, परशुराम बाळशंकर, त्रिमुख बाळशंकर, लायकअली नदाफ, गौरीशंकर भरमशेट्टी, शिवप्पा फसगे, मनोज भरमशेट्टी, सायबण्णा सुतार, योगीराज भरमशेट्टी, प्रदिप भरमशेट्टी, रमेश छत्रे, महादेव बंदिछोडे, सिध्दाराम भरमशेट्टी, अप्पू पारतनाळे, सिध्दाराम हेगडे, मिलन भरमशेट्टी, सिध्दाराम बकरे, भिमा सुतार, विश्वनाथ भोसले, बसवराज हेगडे यांच्यासह के.बी.प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल भरमशेट्टी यांनी तर आभार वैभव भरमशेट्टी यांनी मानले.

About Author