अक्कलकोट नगरपरिषदेच्या विषय समिती सभापती निवडी बिनविरोध

Shobha Khedagi

। अक्कलकोट : प्रतिनिधी

अक्कलकोट नगरपरिषदेच्या स्थायी समिती सभापतीपदी 6 पैकी 5 भाजपाचे तर 1 काँग्रेस (आय) चे सभापती बिनविरोध निवड करण्यात आले आहे. सदरील निवड नगरपरिषदेच्या सदस्यांचा विशेष सभा व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे घेवून सभापतींचे निवड करण्यात आले असल्याचे पिठासन अधिकारी तथा तहसिलदार अंजली मरोड यांनी एका पत्रकान्वये दिली आहे.

सदरील निवड कोरोना कोवीडचे संसर्ग होवू नये म्हणून अप्पर सचिव नगरविकास विभाग महाराष्ट्र शासन यांनी वाचा क्र.5 उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार रिक्त पदे विहीत पध्दतीने भरणे आवश्यक असल्याने नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष तसेच नगरपरिषद व नगरपंचायत मधील स्थायी व विषय समितीमधील पदे रिक्त झाल्यास अंतर्गत निवडणूकीव्दारे भरण्यात यावे. सदर निवडणुकांसाठी आयोजित करावयाची सभा 3 जुलै 2020 च्या पत्रकात कळविल्याप्रमाणे केवळ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारेच घेण्यात यावी. सदर पध्दतीने अंतर्गत निवडणूका घेताना निवडणुकी बाबतचे सर्व बाबी अभिलेख विहीत पध्दतीने अभिलिखित व जतन करण्यात यावे असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलेल्या आदेशानुसार पिठासिन अधिकारी तथा तहसिलदार अंजली मरोड यांनी नगरपालिकेच्या विषय समित्यांच्या निवडीकरिता नगरपरिषद सदस्यांची विशेष सभा अक्कलकोट नगरपरिषदेच्या सभागृहात 6 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वा. वाचा क्र.5 मधील तरतुदीनुसार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे आयोजन करण्यात आले होते. अक्कलकोट मुख्याधिकारी यांच्याकडे विशेष समिती, स्थायी समिती सदस्यांचे नामनिर्देशन अर्ज भरणे सकाळी 11 ते 1, नामनिर्देश पत्रांची छाननी व परत घेणे दु.1 ते 2, विशेष समिती सभापती पदासाठी नामनिर्देशन पत्र सादर करणे दु.2 ते 2.30, विशेष समिती सभापती निवडणूक घेवून निकाल जाहीर करणे आणि स्थायी समिती रचना जाहीर करणे दु.3.30 असे कार्यकाळ देण्यात आले होते.

यामध्ये पाणीुपरवठा व जलनिस्सारण समितीसाठी श्रीमती अरुणा पवार, स्वच्छता, वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापती पदासाठी अश्विनी विनोद मोरे, सार्वजनिक बांधकाम समिती सभापती पदासाठी सद्दाम नूरअहमद शेरीकर, महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी पूजा ऋतुराज राठोड, नियोजन व विकास समिती सभापती पदासाठी यशवंत अंबादास धोंगडे, स्थायी समिती सभापती पदी नगराध्यक्ष शोभा शिवशरण खेडगी यांची प्रत्येकी 1-1 अर्ज आल्याने बिनविरोध निवड करण्यात आले.

पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापती : अरुणा पवार, सदस्य : अंबण्णा चौगुले, अंबुबाई कामनूरकर, महेश हिंडोळे, मिलन कल्याणशेट्टी.

स्वच्छता, वैद्यक आणि सार्व.आरोग्य समिती सभापती : अश्विनी मारे, सदस्य : अंबण्णा चौगुले, भागुबाई कुंभार, अंबुबाई कामनूरकर, सोनाली शिंदे, आलम कोरबु.

सार्वजनिक बांधकाम समिती सभापती : सद्दामहुसेन शेरीकर, सदस्य : महेश इंगळे, विकास मोरे, दिपमाला आडवितोटे, सावित्री पुजारी, नसरीन बागवान,

महिला व बाकल्याण समिती सभापती : पूजा राठोड, सदस्य : जितेश यारोळे, सोनाली शिंदे, स्वाती पुकाळे, भागुबाई कुंभार, दिपमाला आडवितोटे, सावित्री पुजारी.

नियोजन व विकास समिती सभापती : यशवंत धोंगडे, सदस्य : सुवर्णा गायकवाड, स्वाती पुकाळे, बसलिंग खेडगी, जितेश यारोळे, आलम कोरबु.

स्थायी समिती सभापती : नगराध्यक्षा शोभा खेडगी, सदस्य : सर्व पाच समितीचे सभापती, महेश हिंडोळे, मिलन कल्याणशेट्टी, अश्पाक बळोरगी असे सर्वांचे बिनविरोध निवड करण्यात आल्याचे माहिती पिठासन अधिकारी तथा तहसिलदार अंजली मरोड यांनी एका पत्रकान्वये दिली आहे.

About Author