उर्वरित पूरग्रस्त वंचितांना आर्थिक मदत करा : आ.सचिन कल्याणशेट्टी यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर

अक्कलकोट, प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे अक्कलकोट तालुक्यातील शेकडो शेतकरी व ग्रामस्थांचे शेत व संसार उपयोगी साहित्य पुराच्या पाण्यातून वाहून गेले. मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन दिवाळीपूर्वी सर्व शेतकर्यांना शासनाच्या निकषा पेक्षा जास्त सहकार्य करण्याचे आश्वासन दिली होती. ती अद्याप आश्वासन पूर्ण झालेली नाही. ते तत्काळ पूर्ण करा असे आशयाचे निवेदन आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिला आहे.
अक्कलकोट तालुक्यात यंदा अतिवृष्टी होऊन भिमा नदी हरणा नदी, व बोरी नदीला प्रचंड प्रमाणात पाणी येऊन नदी पात्रा लगतच्या शेकडो शेतकर्यांचे हजारो हेक्टर शेत व गावात पाणी शिरून ग्रामस्थांचे सर्व संसार उपयोगी साहित्य, गोरे-ढोरे, जणावरे पुरात वाहनू गेले. या पुराचे पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे अक्कलकोटला आले होते.
त्यावेळी उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांना दिवाळीपूर्वी आपातग्रस्त शेतकरती व ग्रामस्थांना शासनाच्या निकषा पेक्षा जास्त म्हणजे हेक्टरी दहा हजार रुपये मदत करण्याचे आश्वासन दिलेले होते. त्या पैकी पन्नास टक्केच लोकांनाच मदत मिळाली असून ते ही तूटपूंज प्रमाणात मिळालेली आहे. या तुटपूंज मदतीवर शेतकरी व आपतग्रस्त ग्रामस्थ आपले संसार उभा करू शकत नाहीत. तेंव्हा शासनाने गंभीर दखल घेऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करून सहकार्य करावे असे विनंतीपत्र आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिल्याने तालुक्यातील आपतग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांतून समाधान व्यक्त केला जात आहे.