रासपचे जिल्हाध्यक्ष सुनिल बंडगर यांचा वाढदिवस साजरा

। अक्कलकोट : प्रतिनिधी
राष्ट्रीय समाज पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुनिल दादा बंडगर यांचा 48 व्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट तालुक्याचे लोकप्रिय आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी नगरसेवक महेश हिंडोळे, नागराज कुंभार, बाळा शिंदे, शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रदीप पाटील, रिपाइंचे ता.अध्यक्ष अविनाश मडीखांबे, रासपचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दत्ता माडकर, रवी सलगरे, कृष्णा कोटी, बसवंत कलशेट्टी, धनंजय गाढवे, वासू कडबगावकर, शिवानंद बिराजदार आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले की अत्यंत अल्पावधीत आपल्या स्वकर्तृत्वाने तालुक्यातील बहुजन समाज बांधवांना जागे करुन त्यांना एकजूट करण्यात सुनिल बंडगर यांचे मोलाचे योगदान आहे. भविष्यात पंचायत समितीच्या निवडणुकीत सुनिल बंडगर यांना भाजपाचे मिञपक्ष असलेल्या रासपला जागा सोडून त्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
तत्पूर्वी माजी मंत्री रासपचे संस्थापक अध्यक्ष तथा विधानपरिषदेचे आमदार महादेव जानकर, माजी राज्यमंत्री बाळासाहेब दो़डतले, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री राजाभाऊ सरवदे, रासपचे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे, मराठवाडा प्रमुख विष्णू गोरे सर, अहमदनगर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुवर्णा जर्हाड पाटील यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या.