शाखाधिकारी पुजारी यांंनी बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय दिले : भोसले

। अक्कलकोट : प्रतिनिधी
बँक ऑफ इंडिया अक्कलकोट शाखेचे व्यवस्थापक शरणप्पा पुजारी यांनी सर्व सामान्यांना बँकेचे माध्यमातून न्याय दिले असून, बँक व ग्राहक यांची सांगड घालून करीत असलेल्या कार्यामुळे व बँक कर्मचारी व अधिकार्यांच्या हितार्थ मोलाची कामगिरी त्यांच्या हातून घडत आहे. त्यामुळेच बँकिंग क्षेत्रातात त्यांचे नांवलौकिक असल्याचे गौरवउद्गार श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी काढले.
बँक ऑफ इंडिया अक्कलकोट शाखेचे व्यवस्थापक शरणप्पा पुजारी यांच्या वाढदिवसानिमित्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने मंडळाचे अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी भोसले हे बोलत होते.
सत्काराला उत्तर देताना बँक ऑफ इंडिया अक्कलकोट शाखेचे व्यवस्थापक शरणप्पा पुजारी म्हणाले की, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व त्यांचे पुत्र प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी स्वामी भक्तांकरिता अध्यावत असे विविध कामे केलेली आहे. काळाची गरज ओळखून केलेला विकास कार्य हे कौतुकास्पद आहे.न्यासाची भाविकाविषयी श्रद्धा, विनम्र सेवा, स्वच्छता, सुरक्षितता, नि:श्वार्थ सेवा या पंच सूत्रीवर गेल्या तीस वर्षापासून वाटचाल सुरु आहे. न्यासाकडून विविध 38 प्रकारचे सेवेने धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक योगदान देते आहे. यावर भाविकांनी ठेवलेला विश्वास आणि केलेल्या अमुल्य सहकार्य हि बाब अतिशय मोलाची असल्याचे गौरवउद्गार यांनी काढले.
यावेळी मंडळाचे सचिव शामराव मोरे, उपाध्यक्ष अभय खोबरे, पुरोहित अप्पू पुजारी, लक्ष्मण पाटील, आप्पा हंचाटे, नितीन शिंदे, शशिकांत कुंभार, संतोष शिर्के, बाळासाहेब शिंदे, गोविंदराव शिंदे, वसंतराव गवळी, अंकुशराव पवार, सिद्धराम कल्याणी, विनायक तोडकर, एस.के.स्वामी, दत्ता माने, राजेंद्र पवार, प्रसाद हुल्ले यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.