रोस्टेड स्वीट कॉर्न सूप

Corn Soop

साहित्य : 1 मध्यम मका, 1 चमचे बटर, 1 कप दूध, आवश्यकतेनुसार तेजपत्ता, 1 मध्यम कांदा, 2 ळिशलशी लसूण, आवश्यकतेनुसार ब्लॅक पेपर, आवश्यकतेनुसार मीठ, 1 चमचे शेंगदाणा तेल, 2 कप पाणी.
कृती : गॅसच्या मध्यम आचेवर मका भाजून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. तेलामध्ये तेजपत्ता आणि बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या फ्राय करून घ्या. यानंतर तेलात कांदे देखील परतून घ्यावेत. भाजलेल्या मक्याचे दाणे काढा. मिक्सरच्या भांड्यामध्ये मक्याचे दाणे, फ्राय केलेलं कांद्याचं मिश्रण आणि थोडेसे पाणी ओतून सर्व सामग्री वाटून घ्यावी. मिश्रणाची बारीक पेस्ट करावी. दुसर्‍या पॅनमध्ये बटर वितळवून घ्या. त्यात मिक्सरमध्ये वाटलेली मक्याच्या दाण्यांची पेस्ट मिक्स करा. त्यात थोडं- थोडं पाणी घालून मिश्रण ढवळत राहा. यानंतर पॅनमध्ये एक कप दूध घाला आणि सर्व सामग्री पुन्हा ढवळा. यानंतर मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ आणि मिरपूड घाला. सूप थोडं जाडसर होईपर्यंत उकळू द्या. गरमागरम स्वीट कॉर्न सूपचा आस्वाद घ्या.

About Author