पुणे पदवीधर मतदारसंघ अक्कलकोट विधानसभा संयोजकपदी प्रदीप पाटील यांची निवड

। अक्कलकोट : प्रतिनिधी
पुणे पदवीधर विधान परिषद मतदार संघाची निवडणूक 1 डिसेंबरला होणार असून यामध्ये पुणे, कोल्हापूर,सांगली,सातारा,सोलापूर या पाच जिल्ह्यातून विधानपरिषदेसाठी पदवीधर मतदार संघातून निवड केली जाते, सदरच्या निवडणुकीची अक्कलकोट विधानसभा क्षेत्रासाठी संयोजकपदी प्रदीप पाटील यांची निवड आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख व जिल्हा संयोजक शशिकांत चव्हाण यांनी आज जाहीर केली आहे.