वागदरी, सलगर व तोळणुरे येथे हातमाग विणकराना ओळखपत्रांचे वाटप

wagadari

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे नोंदणीकृत्त हातमाग विणकराना ओळखपत्रांचे वाटप अक्कलकोट तालुका राष्ट्रीय हटगार (कोष्टी) महिला अध्यक्षा सुनंदा आष्टगी व तोळणुचे सरपंच विजयलक्ष्मी हुलमनी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
विणकर समाजाचे जेष्ठ नेते मलप्पा निरोळी यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या कार्यक्रमास महेश वानखेडे, गुंडप्पा सुगुरे, सिध्दप्पा हुलमनी, शरणबसप्पा आष्टगी, पूजा सतीश पुरंत, शारदाबाई रोटे, रमाबाई घुले, कस्तुरबाई कोणजी, शंकर कोणजी, बसवणप्पा कोणजी आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी बोलताना सुनंदा आष्टगी म्हणल्या की, अक्कलकोट तालुक्यातील विणकरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तसेच त्याच्या न्याय हक्कासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट करून ते पुढे म्हणाले की, अक्कलकोट तालुक्यातील तोळणुरे येथे 40, सलगर येथे 39 व वागदरी येथे 25 हातमाग विणकरांना केंद्र सरकारकडून नोंदणीकृत्त ओळख पत्र वाटप करण्यात आले आहे. सलगर येथे महिला व बाल कल्याण सभापती स्वाती शटगार यांच्या हस्ते विणकराना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना सिध्दप्पा हुलमनी म्हणाले की, विणकर ओळखपत्र हे पेन्शन योजना, वखार शेड, व बँक लोनसाठी व शासनाच्या सर्व योजनासाठी उपयोगात येणार आहे. नोंदणीकृत्त हातमाग विणकराना 45 दिवसीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर नोंदणीकृत्त हातमाग विणकराना स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी 2लाख 16 हजार रू ंमिळणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी मलप्पा निरोळी, चंद्रकांत बटगेरी यांचे भाषणे झाली. प्रारंभी तोळणुचे सरपंच विजयलक्ष्मी हुलमनी यांच्या हस्ते परमेश्वर प्रतिमेचे पूजन करण्यात आले. चंद्रकला बटगेरी यांनी स्वागत व सुत्रसंचालन केले तर नागप्पा आष्टगी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेश्मा सोनकवडे, चांगुना बाबर, गंगूबाई मैदर्गी, महादेवी बरगाले, शांताबाई आळंद, भाग्यश्री निलगार,गिकमला नंजुडे, पार्वती कोणजी, शारदाबाई रोटे, रमाबाई घुले, कस्तुरबाई कोणजी, महादेवी बरगाले, कमलाबाई बरगाले, कावेरी नंजुडे, सुनंदा शिरगण, भारती पंचाक्षरी, सुभद्रा भावी, गुरनिंगप्पा बिरगौड, पार्वती मड्डे, चतुराबाई शिरगण, शैलाबाई शिरगण सुनंदा शिरगण आदी उपस्थित होते.

About Author