प्राणार्पण करणार्या सैनिकांची प्रेरणा घ्या : महादेव हेगडे

। अक्कलकोट : प्रतिनिधी
देशासाठी प्राण अर्पण करणार्या सैनिकांपासून प्रेररा घेऊन आपण असे काहीतरी काम केले पाहिजे. जे आपल्या पश्चातही सर्वांच्या स्मरणात राहल, असे मत सीमा सुरक्षा दलाचे जवान महादेव हेगडे यांनी व्यक्त केले. येथील मराठा मंदिर श्री शहाजी प्रशालेमध्ये प्रशालेचे माजी विद्यार्थी शहिद मोहन चव्हाण, (रा.बासलेगाव) यांच्या शौर्यगाथा श्रध्दांजली कार्यक्रम झाला. त्यावेळी हेगडे बोलत होते.
व्यासपीठावर वीरमाता गंगाबाई चव्हाण, सुरेश चव्हाण, थावरू चव्हाण, वालूबाई चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र राठोड, मुख्याध्यापक आर.बी. भोसले, उपमुख्याध्यापक शिवाजी भांगरे आदी उपस्थित होते. प्रारंभी मोहन चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शहीद जवान चव्हाण यांचे कुटूबीयांचा सन्मान करण्यात आला. वीरमाता गंगाबाई यांच्या हस्ते बीएसएफ लातूर येथून आलेल्या शिलालेखाचे पूजन करण्यात आले. उपामुख्याध्यापक शिवाजी भांगरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र राठोड, जि.प.बासलेगाव शाळा व्यवस्थापन अध्यक्ष लालसिंग राठोड, मोतीराम राठोड, मंगेश चव्हाण अरबाळे, भोसले यांनी मनोगत व्यक्त केले.