तालुक्यातील शेतकरी पिकविम्यापासून वंचित

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यात यंदा पावसाने मोठा कहर केला. अतिवृष्ठी बोरीनदी व भिमा नदीकाठ महापुराने शेतीचे मोठे नुकसान झाले. मुख्यमंत्र्यासह महसूल मंत्री बाळासाहेेब थोरात, कृषीमंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे, विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांचा तालुका दौरा केला. झालेले प्रचंड नुकसान जगजाहीर आहे. मात्र रब्बी पिक विमा भरूनही अद्यापही पिक विमा रक्कम शेतकर्यांना मिळाले नसल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. विमा भरलेल्या शेतकर्यानां विनाअट सरसकट पिकविमा रक्कम तात्काळ मिळावी अन्यथा विविध संघटनांनी विमा कार्यालयावर मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
अक्कलकोट तालुक्यात यंदा पावसाने मोठा कहर केला आक्टोबर मध्ये अतिवृष्ठी झाली. बोरी भिमा नदी काठ महापुराने शेती व पिकांचे जनावरे घर संसारउपयोगी साहित्य प्रचंड हानी झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसुलमंत्री, कृषीमंत्री, पालकमंत्री यांच्यासह विरोधी पक्षनेते तालुक्याच्या दौर्यावर येऊन गेले. खरीप पिकांची प्रचंड हानी झाली असे असतानाही ज्या शेतकर्यांनी खरीप पिक विमा भरला त्या शेतकर्यानां पिक विम्याची रक्कम अद्याप मिळाली नाही. पिक विम्या पोटी शासन हिस्स्याची रक्कम शासनाने पिक विमा कंपनीला अदा केल्याचे सांगितले आहे. तरी पण पिक विमा कंपनी कडून अद्यापही पिक विमा रक्कम शेतकर्याच्या बँक खात्यावर जमा झाले नाही.
अक्कलकोट तालुक्यात अतिवृष्टीने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे पिक विमा कंपनीने ज्या शेतकर्यांनी पिक विमा भरला अशा शेतकर्यांना पिक विमा पोटीची रक्कम तात्काळ शेतकर्यांच्या खात्यावर जमा करावी अन्यथा पिक विमा कंपनी कार्यालयावर शेतक र्यांचा मोर्चा व आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटेनेच्यावतीने नरेंद्र पाटील, भारतीय लहुजी सेना जिल्हाध्यक्ष वसंत देडे, रासपचे जिल्हाध्यक्ष सुनिल बंडगर आदी शेतकर्यांच्या पिकविमापोटीची रक्कम तात्काळ मिळावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे.