बसवेश्वर मार्केट यार्डात जनावरांच्या आठवडी बाजाराची सुरवात

Bajar Samitee

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट बसवेश्वर मार्केट यार्डात जनावरांचा बाजार जिल्हाधिकारी यांच्या आदेशानेआठ महिन्यांनी आज सोमवारी सुरू करण्यात आले.
अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अप्पासाहेब पाटील हे होते. बाजार समितीचे सचिव मडोळप्पा बदोले यांनी मुख्य प्रवेशद्वारावर सॅनिटायझर, मास्कची व्यवस्था करून येणार्‍या शेतकरी, व्यापारी यांची तपासणी करून सामाजिक अंतर आदींबाबत खबरदारीच्या उपायांची कडक अमल बाजवणी केली होती. गो-मातांची शाल पांघरून उपस्थितांचे हस्ते पूजन करण्यात आले. याकामी बाजार समितीचे सभापती संजीवजकुमार पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
आठ महिन्यापासून अतिवृष्टी,पूर यामुळे अनेक गाई,गुरांचा मृत्यू झाल्याने शेतकर्‍यांचे जीवन उध्वस्त झाले आहे.बाजार बंद असल्याने शेतकर्‍यांचे पशुधन मातीमोल दराने व्यापार्‍यांनी विकत घेण्याचा सपाटा लावला होता.आज पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने जनावरांची खरेदी विक्री झाली.
यावेळी शेतकर्‍यांना मोफत मास्क वाटून बाजाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी स्वामींनाथहिप्परगीअध्यक्षअडत व्यापारी असोसिएशन, मल्लिनाथ साखरे,अध्यक्ष,व्यापारी महासंघ, चंद्रकांत स्वामी, विश्वस्त अक्कलकोट एज्यु सोसायटी, जेष्ठ अडत व्यापारी आदीजण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमास गुरूशांत कोळे, शिवप्पा रामपुरे, संदर्भ बोधले, कुपेंद्र ढाले, सुभाष शिंदे, भीमसेन मंडीखांबे पशुपालक शेतकरी व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज पहिल्या दिवशी सुमारे पाचशे गाईगुरे आणि एक हजार शेळ्या बाजारात आल्या होत्या. परगावचे मोठे व्यापारी न आल्याने केवळ पन्नास टक्के व्यवहार पूर्ण झाले. श्रीशैल कडगंची, गौरीशंकर मजगे, नूर शेरीकर आदि कर्मचारी वर्ग देखील उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. संतोष अगरखेड यांनी तर आभार जोतिबा पारखे यांनी मानली.

About Author