हसापुर येथे सम्यकसंबोधी सामाजिक संस्थेचे उद्घाटन

Hasapur

। हसापूर : प्रतिनिधी
मौजे हसापुर येथे सम्यकसंबोधी मागासवर्गीय सामाजिक संस्थेची स्थापना व उद्घाटन करण्यात आले. व या संस्थेच्या उद्घटनासाठी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष चंद्रशेखर आण्णा मडीखांबे, नेहरू युवा केंद्र अक्कलकोट समन्वयक गौतम बाळशंकर, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हासचिव देवा आण्णा अस्वले, शिव बसव बी.आर.आंबेडकर मागासवर्गीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संदीप भाऊ मडिखांबे, भीमप्रकाश मागासवर्गीय बहुद्देशीय संस्था चे शिलामनी दादा बनसोडे, सम्यक विद्यार्थी आंदोलनचे महाराष्ट्र प्रदेश कोअर कमिटी सदस्य तथा तालुका अध्यक्ष रविराज पोटे, संत कक्कया महाराज युथ फाउंडेशन चे अध्यक्ष उत्तम भाऊ इंगळे, महेश गायकवाड रोहित उघडे, आशिष गायकवाड, बंटी नडगम उपस्थित होते.
कार्यक्रमाची सूरुवात महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. त्यानंतर संस्थेची रिबीन कापून उद्घाटन सोहळा पार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमात संस्थेच्या उद्धघटना दिनीच कामची सुरुवात म्हणून कोविड-19 च्या काळात आपल्या प्राणाची परवा न करता. अहोरात्र गावासाठी केलेल्या कार्याबद्दल पोलीस पाटील दिगंबर सोनकांबळे, सरपंच गौरीशंकर स्वामी, माजी उपसरपंच मारुती घटकांबळे, होमगार्ड, आशा वर्कर, आरोग्य सेवक , ग्रामपंचायत शिपाई, प्राथमिक शाळा, अंगणवाडी शाळा, महिला ग्रामसंघ, इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे व्यक्तींचा सम्यकसंबोधी मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने कोविडयोद्धा म्हणून सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सम्यकसंबोधी मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा शांताबाई प्रभाकर घटकांबळे यांनी सर्व कोविड योद्धानापुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सहसचिव दत्तात्रय कदम यांनी केले. व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे खजिनदार पूजा बाबासाहेब घटकांबळे यांनी केले. तसेच या कार्यक्रमाचे आभार संस्थेचे सचिव साहिल कांबळे यांनी मांडले.
व या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश घटकांबळे तसेच महिलावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते व संस्थेचे पदाधिकारी व भीमनगर पंचकमिटी,समस्त ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

About Author