तोळणूर येथे रिपब्लिकन पक्षाच्या शाखेचे उद्घाटन

। तोळणूर : प्रतिनिधी
धम्मचक्रप्रवर्तन दिनाचे औचित्य साधून अक्कलकोट तालुक्यातील तोळणूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आठवले) गटाच्या शाखेचे व कार्याध्यक्ष आपाशा लच्याण यांच्या संपर्क कार्यालयाचे अनावरण रिपाइं नेते प्रा.राहुल रुही यांच्या हस्ते व प्रमुख पदाधिकारी ठडझ सोलापूर जिल्हाध्यक्ष सुनील बंडगर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी अक्कलकोट तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी तालुका सरचिटणीस सैदप्पा झळकी तोळणूरचे प्रथम नागरिक सरपंच सिद्धाराम होनमनी गावचे पोलीस पाटील ता.उपाध्यक्ष अंबादास गायकवाड चंद्रकांत गायकवाड युवक ता.अध्यक्ष अप्पा भालेराव सचिव संदीप गायकवाड शहर अध्यक्ष प्रसाद माने दत्ता कांबळे सचिनकुमार बनसोडे नागेश कांबळे आदी रिपाइं पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
यावेळी बोलताना रिपाइं नेते प्रा.राहुल रुही म्हणाले की , भारतीय दलित पँथर पासून कर्नाटक महाराष्ट्र सीमावर्तीत भाग तोळणूर ना.रामदास आठवले साहेब व ना.राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे पुढे हीच परंपरा आपाशा लच्यान यांनी सुरू ठेवली आहे पक्ष वाढीसाठी शाखाने काम करावे लोकांची विधायक कामे मार्गी लवावित ता.अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात पक्ष झपाट्याने वाढत आहे अशी प्रतिक्रिया दिली व नूतन पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.