सातनदुधनी येथे आ.सचिन कल्याणशेट्टी यांची पुरपरिस्थितीची पाहणी

। सातनदुधनी : प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्याचे लोकप्रिय आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सातनदुधनीसह बबलाद, तळेवाड येथे पुरग्रस्थ भागाची पाहणी करुन शेतकरी व गावकरी यांचेशी संवाद साधला.
सातनदुधनी येथील बोरीनदीकाठचा पाटबंधारा, मैंदगी जोडणारा रस्ता,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे पुरामुळे झालेले नुकसान,गावातील पडझड घरे,पुराच्या पाण्याने-अतिवष्टीमुळे पडलेले घरे, शेतकर्यांची पिकांची, विजेचे पडलेले खांबांची तसेच पशुधनाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केले व तसेच संबंधित महापुराचा पंचनामा करणा-या अधिकारी-कर्मचा-यांना शासनाच्या नियमानुसार गावक-यांना भरीव मदत करण्यासाठी त्वरीत पंचनामा करुन लवकरात लवकर प्रस्ताव पाठविण्यासाठी आदेश दिले. सध्या गावात जनावरांना विविध आजार जडत असुन शेतकर्यांना स्वत:चे पशुधन सांभाळण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच तोळणुरच्या पशुचिकित्सालयास सातनदुधनी गाव नुसती नावापुरते जोडण्यात आले आहे.
जनावरांचे आरोग्य तपासणी शिबीरे कधीच नाही तर दवाखान्याचे कर्मचारी कोण आहेत हेही गावक-यांना माहिती नाही, त्यामुळे सदर सातनदुधनी गाव तोळणुर ऐवजी जवळच्या मैंदगी केंद्रास जोडून जनावरांचे आरोग्याचे सुविधा उपलब्ध करावे याकरिता डॉ. राठोड तालुका पशुचिकित्सा अधिकारी, पंचायत समिती यांचेकडे संपर्क केले असता, कोरोना संसर्ग महामारी कमी झाल्यावर आपला गाव मैंदगी जोडण्यात येईल असे त्याचेकडून माहिती मिळाले,परंतु आजतागायत हा विषय प्रलंबित ठेवण्याचा पाप या केंद्राकडून होत असल्याचे कल्पना गावकरी आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी देऊन यासाठी शिफारस करण्यासाठी विनंती आले. यावर सव कामकाजाचे पाठपुरावा करून कामे त्वरीत मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार महोदयांनी गावकर्यांना दिले.