अक्कलकोट येथे सीमोलंघन साधेपणाने साजरा

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट येथील आराध्यदैवत अंबाबाई मंदिरासमोर गेल्या 50 वर्षापासून चालत आलेली सिम्मोलंघन यंदा कोरोना कोवीड-19 चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अत्यंत साधेपणाने अकरा जणांच्या उपस्थितीत विजयादशमी साजरा करण्यात आला.
दसरा सण हे हिंदू धर्मातील मोठ्या सणापैकी एक सण म्हणून साजरा केला जातो. सदरील सण अश्विन शुध्द प्रतिपदा अमावस्येच्या दिवशी घटनास्थापना करुन सर्व हिंदू बंधू व भगिनी नऊ दिवस उपवास करुन अश्विन शुध्द नवमी दिवशी आराध्यदैवत अंबाबाई मंदिरासमोर सिम्मोलंघन करुन विजयादशमी साजरा केला होतो.
कोरोनामुळे देशावर मोठे संकट ओढवलेले असल्यामुळे केंद्र व राज्य सरकारने मंदिर, मस्जिद, शाळा, हॉटेल, मॉल व सामाजिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आले होते. आता सध्या अनलॉकडाउनच्या पाचव्या सत्रात आपण जात असतानाही कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून महाराष्ट्र शासनाने हॉटेल, मॉल, सार्वजनिक कार्यक्रम वगळता मंदिर, मस्जिद, शाळा अजूनही बंद आहेत. यामुळे गेल्या पन्नास वर्षापासून अविरतपणे चालत आलेली अक्कलकोट बुधवार पेठ येथील अंबाबाई मंदिरासमोर हजारो हिंदू बांधवांच्या उपस्थित साजरे केले जाणारे सिम्मोलंघन यंदा अत्यंत साध्या पध्दतीने अकरा जणांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
सदरील कार्यक्रम साजरा शासनाच्या सर्व नियमाच्या आधिन राहून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर याचा वापर करुन साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित बांधवांनी जगावर ओढवलेल्या कोरोनाला संकट, आदीशक्ती अंबाबाईनी दूर करावी, जनसामान्यांना सुखी व समृध्द करावी असे साकडे घालून सर्व हिंदू बांधवांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.