सलगर येथे पशुवैद्यकीय लसीकरण शिबिर संपन्न

। सलगर : प्रतिनिधी
कोरोना पाठोपाठ आता जनावरांना लंपी स्कीन डिसीज आजाराची लागण, पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात लंपी आजाराने तोंड वर काढले आहे. त्यामुळे शेतकर्यांची चिंता वाढली आहे. अगदी हंगामाच्या दिवसामध्ये जनावरे आजारी होत असल्यामुळे पशुचिकित्सकाकडे उपचारासाठी नेत आहे. मात्र अनेक ठिकाणी लस उपलब्धच नसल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे.
तर काही ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते शेतकर्यांच्या मदतीला धाऊन आले असून ते स्वखर्चाने लस उपलब्ध करून देत आहे. जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागानेही व ग्रामपंचायत सलगर नियोजन केले असून गावागावंत शिबिर आयोजित केले आहे. पशुवैद्यकीय आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते डॉ राठोड यांनी 500 जनावरावर व शेळ्या 100 आरोग्य तपासणी करुन लसीकरण करण्यात आले.
आजार टाळण्यासाठी गोठा स्वच्छ ठेवावा, पाणी साचू नये यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. गाई व म्हशीमधील सर्व वयाच्या जनावरांना हा रोग होऊ शकतो. परंतु लहान वयाच्या जनावरांना याचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. या विषाणूचे शेळ्या मेंढ्यातील देवीच्या विषाणूशी साधर्म्य आढळून येत असले. हा आजार शेळ्या, मेंढ्यांना नाही.
त्या जनावरांना योग्य ते औषधोपचार करण्यात आले आहे या शिबिराला शेतकरी यांनी आपल्या बैलांना आणुन तपासणी करण्यात आली व लसीकरण करण्यात आले. यावेळी जि प सदस्य सौ स्वाती शटगार, सरपंच सौ सुरेखा गुंडरगी, ग्राम विकास अधिकारी, प्रदीप तोरस्कर, लिपिक रेवणप्पा बोरगाव, व पशु वैद्यकीय अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते, ग्रामस्थांनी गावात शिबीर घेतल्याने समाधान व्यक्त केले आहे व शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.