राम चौगुले मित्र परिवाराच्यावतीने नवरात्री निमित्त 150 महिलांना उपवासाच्या फराळाचे वाटप

faral

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथे राम चौगुले व मित्र परिवाराच्या वतीने 150 महिलांना रिपाई तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्या हस्ते उपवासाच्या फराळाचे वाटप करण्यात आले.
यंदा कोरोना सारखी महामारी जगात सतावत असताना गरीब व गरजु लोकांची अत्यंत वाईट परिस्थिती आहे अशात दसरा हा हिंदु धर्मातील पवित्र सण मानला जातो, अशात अनेक महिला भगिनी नावरात्रीची नऊ दिवस उपवास करत असतात अश्या 150 महिलांना राम चौगुले व मित्र परिवाराकडून उपवासाच्या फराळाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी राम चौघुले बाबु बाजारमठ, रिपाइं युवक आघाडी तालुका उपाध्यक्ष विजयकुमार पोतेनवरु, रिपाइं मैंदर्गी शहर अध्यक्ष खाजप्पा पोतेनवरु,मरागु चौगुले, मरागु विटकर, हावदाबार पुजारी, कातु चौगुले, कशिनथ पुजारी, सचिन मजुळाकर, यालपा मजुळाकर, सिदराम निबाळ, भिमा चौगुले,किणा मजुळाकर अन्य उपस्थित होते.

About Author