कर्जाळ मराठी शाळेचा ऑनलाइन नवरात्र महोत्सव-नवरंग स्त्रीत्वाचे

। अक्कलकोट : प्रतिनिधी
जि.प.प्रा. मराठी शाळेत नेहमीच शैक्षणिक व सहशालेय सांस्कृतिक उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्न केले जातात.
दरवर्षीप्रमाणेच यावर्षी पण वेगळ्या पद्धतीने शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त म नवरंग स्त्रीत्वाचे या उपक्रमातून इ. तिसरी मधील विद्यार्थींनीसाठी नऊ दिवस नऊ रंग देवून नऊ विषय निवडले गेले, या नवरंग नऊ विषयातून विद्यार्थिनी व माता पालक प्रबोधन करून जीवनात रंग हे फक्त दिसण्यापुरते नाही तर स्त्रीयांनी स्त्रीत्व जपण्यासाठी विचार करणे गरजेचे आहे हे विविध विषयांच्या माध्यमातून वर्गशिक्षक सुवर्णा बोरगांवकर यांनी सांगितले.
यात पहिला रंग- स्त्री भ्रूण हत्या थांबवण्याचा, दुसरा रंग – मुलगी झाल्यावरही मुलगा झाल्या इतकाच आनंद मानायचा, तिसरा रंग- आपल्याच मुलीकडे लायबिलीटी म्हणून न पाहता एसेट म्हणून पाहायच्या वृत्तीचा, चौथा रंग- मुलीला भरपूर शिकवून स्वावलंबी करायच्या मानसिकतेचा, पाचवा रंग – स्त्रियांवर होणारे आत्याचार रोखण्याचा, सहावा रंग – स्त्रीच्या बौध्दिक व मानसिक कणखरतेला सलाम करायचा, सातवा रंग – निर्भयपणे जगण्याचा, आठवा रंग – स्त्री पुरुष समानतेचा, नववा रंग- स्त्री च्या शक्तीचा सन्मान करण्याचा हे विषय घेवुन ऑनलाइन प्रबोधन केले व नऊ दिवस नवरंगांचा आनंदही दिला.
वर्गशिक्षक सुवर्णा बोरगांवकर व इ.तिसरीतील विद्यार्थीनी व माता पालक यात आनंदाने ऑनलाइन सहभाग नोंदविला.