भोसले पिता-पुत्र आमचे जुने जवळचेच! : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

। अक्कलकोट : प्रतिनिधी
राज्य, देश-विदेशात अन्नदान सेवार्थ कार्यरत असलेल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांच्या पहिल्याच भेटीत न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, क्रिडा, सांस्कृतिक सुरु असलेल्या कार्याचे कौतुक केले.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अन्नछत्र मंडळास सोमवारी सदिच्छा भेट दिली. न्यासाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व त्या नियमांचे पालन करण्यात आले. यामध्ये मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर, सामाजिक अंतराबाबतची काळजी घेण्यात आली.
जन्मेजयराजे भोसले यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या आठवणी सांगितल्या तर अमोलराजे भोसले यांची झालेली भेट बाबती माहिती सांगितले असा ना.ठाकरे यांनी ‘आमचे तुम्ही जुनेच जवळचे’ असल्याचे सांगून कार्याचे कौतुक ना.उध्दव ठाकरे यांनी करुन विजयबाग येथील भेटीत सोमवारचा प्रसंग देखील यावेळी चर्चा झाली.