संकट महापुराचा सहन करायचा कसा?

। सातनदुधनी, प्रतिनिधी
नळदुर्ग नर धबधब्यातून कुरनूर धरणात सोडण्यात आलेल्या पाण्याचे विसर्ग बोरीनदीत आल्याने नदीकाठचे शेतात व गावात पाणी शिरल्यामुळे गावातील शेतकर्यांचे व गावकर्यांचे मोठे नुकसान झाले. अचानक आलेल्या महापूराचे कल्पना प्रशासनाकडून कळविण्यात आले असताना गावकर्यांचे मनुष्यहानी टळला, परंतु शेतकर्यांचे जमिनी पिके, जनावरे, छप्पर, घरातील साहित्य वाहून गेले. या गावाला जोडणारे मैंदर्गीचे रस्ता वाहनू गेला. वाहतूक व्यवस्था ठप्प आहे. शेतातील व बोरीनदीच्या पात्रातील मोटारी, पाईप विद्युत व्यवस्था वाहून गेले.
सध्या गावात अंधार्यात आहे. विद्यूत खाबे उन्मळून पडलेले आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेले चक्रीवादळ महाराष्ट्राच्या काही भागातून अरबी समुद्रात जाणारा दिशा बदलल्या मुळे सध्या पाऊस बंद आहे. परंतु शनिवार दि. 10 पासून दि. 13 पर्यंत या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे गावातील घरे उन्मळून पडले यामुळे नागरिक मोठ्या संकटात असून शेतकर्यांचे पिके, पशुधन ही वाचवणे मुस्कील झाले आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे दौरे तालुक्यात झाले, सोमवार दि. 19 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे याचे पूरग्रस्था भगााचे नियोजित दौरा आहे. या भागाकडे प्रशासन पदाधिकारी यांचे लक्ष असू द्या असे सातनदुधनी, तळेवाड हालहळ्ळी, जकापूर, व मैंदर्गी नागरिकांची विनंती आहे.
सध्या सातनदुधनी गावात विद्युत व्यवस्थे आभावी पाणी पुरवठा, दळणाचे व्यवस्था,दुरध्वनी व्यवस्था बंद आहे. यातच नवरात्रचे सणात घट स्थापनेनिमित्त ग्रामीण भागात घर स्वच्छ करून धुणे वगैरे कामकाज दरवर्षी केला जातो. यासाठी पाण्याचे अत्यंत गरज असते. याचाही नागरिकांना त्रास सहन करून डोंगर दर्यातून विहीरीतून पाणी आणण्याचे प्रसंगी आले. गावातील परिस्थिती हाताळताना गावकरी ग्रामपंचायतीच्या व प्रशासनाच्या सहकार्याने एक दिलाने एकमेकास सहकार्य करत आहे. दि. 17 रोजी पाणीपुरवठा व्यवस्ता होण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने एक मदिराच्या बोअरवेलला जनरेटरची व्यवस्था करून पाण्याचे तात्पुतरे प्रश्न मिटविले. परंतु कायमचे पाण्याचे विजेेचे व्यवस्था होण्यासाठी प्रशासनाकडून तातडीने लक्ष घालणे अपेक्षित आहे.
या भागातील ऊस, तुरी, सुर्यफूल, कांदे व इतर पिकांचे मोठ्या नुकसन झाले असून खरीप पिकांची पेरणी उशीरा आलेल्या पावसामुळे वाया गेल्या. यानंतर रब्बी पेरणी करताना चक्रीवादळामुळे पाऊस व महापूर आला. कोरोना महामारीशी लढताना महापूर येऊन इतके नुकसान सहन करावा लागला. यामुळे शासनाकडून भरीव प्रमाणात मदतीचे अपेक्षा नागरिक करीत आहेत.
महापूरामुळे सातनदुधनी गावात विजी खंडीत झाल्यामुळे पाणी पुरवठा सलग तीन दिवस बंद असातान ग्रामपंचायतीच्या वतीने जनरेटर आणून चौडेश्वरी देवी मंदिराच्या बोअरवेल यंत्रणेला लावण्यात आले. यामुळे गावकर्यांना पाण्याचे प्रश्न मिटला. यामुळे गावकर्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
गावात पिठाची चक्की, मोबाईल सेवा, बीजेअभावी बंद आहे. यावरही मार्ग काढून लवकरच सोय करण्यात येईल असे ग्रामपंचायतीच्या वतीने कळविण्यात आले. याबाबत प्रशासनास कळविण्यात आले असे ही सरपंच विठ्ठलराव खताळ व ग्रामसेवक स्वामी यानीं माहिती दिली.