आ.सचिन कल्याणशेट्टी यांनी संगोगी येथील आपतग्रस्तांची घेतली भेट

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील संगोगी (ब) येथील एका शेतकर्याचे राहते घर, 18 शेळ्या, पाच एकर ऊसासह संगोगी (ब) ते तळेवाड रस्त्यावरील अर्धा कि.मी.रस्ता महापूरात वाहून गेला आहे.
यंदाच्या वर्षी पावसाळा सुरु झाल्यापासून सर्व ऋतू दमदार हजेरी लावले. संपूर्ण तालुक्यातील तूर, उडीद, सोयाबीन, मूग, सुर्यफूल, शेंगा आदी खरीप पिके जोमाने आलेले होते. मात्र जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने पाण्यात उभारलेल पीक वाया जाणार की काय? अशा भीतीत असलेल्या शेतकर्यांना अखेर 13 ऑक्टोंबर रोजी रात्रो 8 वा. 14 ऑक्टोंबर 2020 रोजी सकाळी वाजेपर्यंत चित्रा नक्षत्राच्या पावसाने तुळजापूर, उमरगा, अक्कलकोट भागात जोरदार बरसल्याने बोरी व हरणा नदीसह अठरा ठिकाणी नाले, ओढ्यांनाही महापूर आल्याने बहुतांश गावांचा संपर्क तुटलेला होता. या महापूरात नदीकाठच्या गावातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. शेकडो, शेळ्या, मेंढी, गुरे-ढोर, घरदार पडले होते. शेतकर्यांच्या हातातोंडाला आलेले ऊस, तूर, उडीद, सोयाबीन, सुर्यफूल, भुईमूग, कापूस आदी पिकासह अनेक खरीप पिक या महापूरात वाहून गेले. अनेकांचे संसार उघड्यावर पडले त्यांनी काय खावो? काय प्यावे? हा मोठा यक्षप्रश्न शेतकर्यांपुढे उभा राहिला आहे. नदीकाठच्या गावातील नागरिक शेताच्या वस्तीत अडकले होते. 12 ते 14 तास पाण्यात उभारुन होते. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी संपर्क साधून होते. रात्रो हरणा व बोरी नदीत प्रचंड प्रमाणात पाणी आल्याने बोरी रामपूर येथे एक व्यकती पाण्यातून वाट काढत येण्याचा प्रयत्न केले. मात्र वेगाने पाणी वाढत असल्यामुळे एका झाडाच्या शेंडीवर चढून बसला होता. त्यानी रात्री दीडच्या सुमारास आ.सचिन कल्याणशेट्टी यांनी फोन लावून साहेब, मला वाचवा, मी नदीच्या पाण्यात अडकलोय, पाणी प्रचंड प्रमाणात वाढत आहे असे म्हणताच आ.कल्याणशेट्टी यांनी तात्काळ बोरी रामपूर येथे भेट देवून त्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा ओघ इतका होता की रात्री अंधारात बाहेर काढता आलेला नाही. आमदार कल्याणशेट्टी यांनी जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडे एनडीआरएफ पथक तात्काळ पाठविण्याचे सांगितले. त्यानुसार एनडीआरएफ टीम बरोबरच स्वत: रामपूर येथे पोहोचले. तब्बल सोळा तासानंतर सुखकर सुटका करुन सुरक्षित स्थळावर पोहोचवण्यात आल्याने आ.कल्याणशेट्टी यांचे ग्रामस्थांनी कौतुक करत आभार मानले.
या बरोबरच बिंजगेर येथील नदी पलिकडे शंभरहून अधिक नागरिक अडकलेले होते. त्यांनाही एनडीआरएफच्या मदतीने सुखरुप सुटका करुन सुरक्षित स्थळी पोहचवण्यात आले. पुराचे पाणी ओसरल्यानंतर आमदार सचिन कल्याण व त्यांचे कार्यकर्ते संगोगी (ब) येथे पोहोचले. येथील संगोगी (ब) ते तळेवाड रस्त्यावरील भवानराया बिराजदार यांच्या शेताजवळील अर्धा कि.मी. डांबरी रस्त्यासह बिराजदार यांचे राहते घर, संसारोपयोगी साहित्य, 18 शेळ्या, पाच एकर तोडणीला आलेले ऊस या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने बिराजदार परिवार रस्त्यावर आलेला आहे. आपतग्रस्त शेतकरी व त्यांच्या पत्नीने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना पाहताच हंबरडा फोडला. कर्ज काढुन पिकविलेली ऊस शेती, घर, संसारोपयोगी साहित्य, गुरे-ढोर सर्व वाहून गेली आहेत. मला वाचवा साहेब, असा हंबरडा फोडला. यावेळी आपत्ग्रस्तांना सात्वंन करत शासन स्तरावरुन जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.