कंगनाविरोधात एफआयआर दाखल करा; कोर्टाचे पोलिसांना आदेश

kagana

मुंबईः नेहमीच बेधडक आणि वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतच्या अडचणी वाढल्या आहेत. मुंबईतील वांद्रे न्यायालयाने कंगनाविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. कंगनाची बहिण रंगोलीविरोधातही एफआयआर दाखल करण्यास सांगण्यात येत आहे.
वांद्रे कोर्टात मुन्ना वराली आणि साहिल अशरफ सैयद यांनी कंगनाविरुद्ध याचिका दाखल केली आहे. कंगनानं बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच, टी.व्ही, सोशल मीडिया या माध्यामांतून ती बॉलिवूडविरोधात बोलत आहे. कंगना सातत्याने घराणेशाहीच्या मुद्द्यावरून बॉलिवूडवर टीका करतेय, असा आरोप याचिकेत केला आहे.

कंगनानं बॉलिवूडमधील हिंदू आणि मुस्लिम कलाकारांमध्ये तणाव निर्माण केला आहे. ती सातत्याने अक्षेपार्ह ट्विट करतेय. तिची ही ट्विट धार्मिक तेढ निर्माण करणारे आहेतच पण यामुळं फिल्म इंटस्ट्रीमधील काही लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, असंही या याचिकेत म्हटलं आहे.

दरम्यान, या प्रकरणी वांद्रे पोलिस स्थानकात कंगनाविरुद्धात तक्रार दाखल करण्यास नकार दिला होता. या नंतर याचिकादारांनी या प्रकरणी वांद्रे कोर्टात धाव घेतली होती. कोर्टानंही या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

About Author