नालवार वस्ती करजगी शाळेचे शिष्यवृत्ती निकाल शंभर टक्के

galgate

। करजगी : प्रतिनिधी
अक्कलकोट महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता पाचवी) तालुक्यातील करजगी गावातील जिल्हा परिषद कन्नड शाळा नालवार वस्ती करजगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले.
परीक्षेस बसलेल्या सहा पैकी सर्व सहा विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत. शाळेतील यशस्वी पात्र विद्यार्थी व त्यांनी मिळवलेले गुण पुढीलप्रमाणे आहेत. पूजा अंबण्णा कोळी (242), विद्या परशुराम केरूर (242), कांचना बसवराज कोळी (222), कादंबरी सिद्धप्पा गलाटे (220), निंगराज उदंडप्पा बिरादार (204), भाग्यश्री रमेश हेळवे (190). जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा नालवार वस्ती करजगी शाळा अक्कलकोट तालुक्यातील करजगी बीट मधील एक उत्कृष्ट शाळा आहे. शिष्यवृत्ती परीक्षा, प्रज्ञाशोध परीक्षा, व्यक्तिमत्व विकास स्पर्धा, क्रीडास्पर्धा, अश्या सर्व क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखत शाळेचा शंभर टक्के निकाल लागल्यामुळे तालुक्यात सर्वत्र शाळेचा कौतुक होत आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक आणि मुख्याध्यापक श्री. ईरबसप्पा सिद्रामप्पा परतबादी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे. मारून मार्गदर्शक व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान असलेले अशोक भांजे गटशिक्षणाधिकारी अक्कलकोट, रतिलाल भुसे शिक्षण विस्तार अधिकारी, शिवाजी शिंदे केंद्र प्रमुख करजगी, प्रिया तोडकरी सरपंच, सर्व सदस्य ग्रामपंचायत करजगी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कासिम अत्तार, उपाध्यक्ष जयश्री हेळवे, सर्व सदस्य, महादेव कोळी, मन्सुर अत्तार, मैलारी कोळी, विद्याधर गंगदे, उमेश हेळवे, दयानंद चव्हाण, सातलिंगप्पा मण्णे, सर्व पालक,तसेच शाळा परिसरातील नागरिकांकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे, शाळेचे कौतुक होत आहे.

About Author