रिपाई व रासपच्या दणक्याने अक्कलकोट मधील हत्ती तलाव त्वरीत दुरुस्ती करण्याचे मुख्याधिकारी यांनी दिले आदेश

। अक्कलकोट : प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने सोलापूर जिल्हा व अक्कलकोट तालुक्यातील विविध गावामध्ये तसेच अक्कलकोट शहरातील विविध भागामध्ये पाणी साचले आहे. तसेच अक्कलकोट मधील सर्वात जुने सुमारे 100 ते 150 वर्षापुर्वी बांधण्यात आलेल्या हत्ती तलावाचे तटबंदी पावसाच्या अती पाण्यामुळे निर्जीण झाले असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 17 तारखेपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तरी पुढील अनर्थ टाळण्यासाठी हत्ती तलावाच्या तटबंदीची त्वरित दुरुस्ती करण्याच्या मागणीचे निवेदन आरपीआयचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे व रासप सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुनिल बंडगर यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट नगरपरिषदेचे मुख्याधिकारी के. अंकित यांना देण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख योगेश पवार, प्रा.राहुल रुही, लक्ष्मण झंपले, युवा नेते लखन झंपले, शुभम मडिखांबे, रोमीत मडिखांबे, वकील मडिखांबे, सुरेश गायकवाड, भरत राजेगावकर, रवी सलगरे, शरणू कुर्ले, पवन अनगले, भाग्येश चुंगीकर, विक्रम मलवे, यलप्पा गुंजले, शिवम कुर्ले यांच्या सह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ़या संख्येने उपस्थित होते. तलावाच्या सभोवताली दाटीवाटीने लोकवस्ती असल्याने तेथील नागरीकांच्या जिवीतास प्रचंड धोका निर्माण झाला आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन रिपाई व रासपच्या नेत्यांनी मुख्याधिकारी, नगरसेवक बसलिंगप्पा खेडगी, तसेच नगरपालिकेचे नगरअभियंता भागवत सांगोलकर, विठ्ठल तेली, मलिक बागवान यांना प्रत्यक्ष ठिकाणी घेऊन जाऊन सद्य परिस्थिती दाखवून दिली असता मुख्याधिकारी के. अंकित यांनी नगरपालिकेचे नगरअभियंता यांना त्वरीत या कामाचे दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे रिपाइंचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे व सुनिल बंडगर यांचे तेथे राहणार्या सर्व नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.