गुणवंत चव्हाण यांना टिचर इनोव्हेशन अवार्ड जाहीर

gunavant

। वागदरी : प्रतिनिधी

स्टेट इनोव्हेशन अँण्ड रिसर्च फाऊंडेशन अर्थात सर फाऊंडेशन ,महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा सर फाऊंडेशन टीचर इनोव्हेशन अवार्ड 2020 साठी जि.प.प्रा.शाळा पिंपळा खुर्द ता -तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद येथील कृतीशील शिक्षक गुणवंत चव्हाण यांना जाहिर झाला आहे. गुणवंत चव्हाण यांच्या प्रयोगशील उपक्रमाचा दखल त्याना पुरस्कारासाठी निवड करण्यात आले आहे.

दर वर्षी सर फाऊंडेशन वतीने राष्ट्रीय स्तरावरील नवनविन राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वागिण गुणवत्ता व शाळेचा गुणवत्ता वाढविण्यासाठी राबवलेल्या उपक्रमशील शिक्षकांना सन्मानित केला जातो.
देशातील 16 राज्यातील 169 प्रयोगशील शिक्षक व क्षिञीय अधिकारी याना इनोव्हेशन अवार्ड प्राप्त झाला आहे.या पुरस्कारांचे वितरण सर फाऊंडेशन च्या वतीने डिसेंबर 2020 मध्ये होणार आहे.

About Author