समर्थनगरातील विश्वनगर नामफलकाचे उद्घाटन

samarth nagar

। अक्कलकोट : प्रतिनिधी

समर्थ नगर ग्रामपंचायतीत येणार्‍या विश्वनगर बोर्डाचे उद्घाटन माजी सरपंच प्रदीप पाटील व शिवशरण जोजन यांच्या हस्ते करण्यात आले तसेच विश्वनगर परिवारातील इ.10वी व इ.12 वी परिक्षेत विशेष प्रावीण्य मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांचा सत्कार समारंभ पार पडला.

या प्रसंगी बोलताना प्रदीप पाटील म्हणाले की, विद्यार्थांनी आपल्या जीवनात ध्येय निश्चित करून पुढील वाटचाल करावी व योग्य स्थान मिळवून समाजात आपल्या माता पित्यांची मान अभिमानाने उंचवावी. दाप्रसंगी व्यासपीठावर ग्राम पंचायत सदस्य रोहिदास राठोड,सतिश खराडे, मुख्या. गफूर जमादार सर, अध्यक्ष शिवाजी नाईक,नटूलाल शेख, संस्थापक फारूक शेख उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जेष्ठ सदस्य अशोक हत्ते साहेब, सचिव अरूण पाटील,खजिनदार शिवानंद देवर,प्रा.श्रीकांत जिड्डीमनी,राजकुमार गोब्बूर, अबरार शेख, नूर बागमारू, कॅप्टन ठोकळे, धनशेट्टी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुद्राक्ष वैरागकर तर आभार प्रा.जिडीमनी यांनी मानले.

About Author