अन्नुसरक्षा व अंत्योदय योजनेत समाविष्ट करण्यासाठी संपर्क करा : आनंद बुक्कानुरे

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील बहुतेक गोरगरिबांवर अन्नसुरक्षा योजनेत अन्याय झालेला आहे. स्थानिक राजकीय व रेशन पुरवठाधारक लोकांनी बहुतेक गावात आपल्या समर्थक लोकांच्या व अतिउत्पादन असलेल्या लोकांच्या अन्नसुरक्षा व अंतोदय योजनेत समाविष्ट केल्याचे तालुका तहसिलदार व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे शिवसेनेच्यावतीने जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे व तालुका प्रमुख संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आनंद बुक्कानुरे यांनी पाठपुरावा करुन तालुक्यातील अन्नसुरक्षा व अंतोदय स्वास्थ्य धान्य योजनेत वंचित राहिलेल्या लोकांचे नाव समाविष्ट करावे म्हणून केलेल्या पाठपुरावाचा भाग म्हणून तालुका तहसिल प्रशासनाने चावडी वाचन करुन गोरगरिब लोकांची नावे समाविष्ट करण्याची हमी दिलेली आहे. वंचित लोकांनी तालुका पुरवठा विभागात कागदपत्रे जमा करावे किंवा शिवसेनेशी संपर्क करावे, गोरगरिब लोकांच्या गरजांचा विचार करुन शिवसेनेने अन्नसुरक्षा अंतोदय स्वस्तधान्य रेशनकार्ड योजनेत केलेल्या कामाचे तालुक्यातून कौतुक होत असल्याचे बुक्कानुरे यांनी सांगितले.
यावेळी तालुका प्रमुख संजय देशमुख, तालुका उपप्रमुख प्रा.सुर्यकांत कडबगावकर, शहर प्रमुख योगेश पवार, प्रविण घाडगे, वर्षा चव्हाण, तारा कुंभार, वैशाली हावनूर, सैपन पटेल, बसवराज बिराजदार उपस्थित होते.