पालक-छोले विथ चीज

Makai Palak

साहित्य : एक वाटी छोले (काबुली चणे) , एक जुड्डी पालक,एक चमचा लिंबाचा रस,एक तमालपत्र, एक बारीक चिरलेला कांदा,एक चमचा जिरे,एक चमचा धने पूड,एक चमचा गरम मसाला,2-3 हिरव्या मिरच्या (बारीक चिरून),सजावटीसाठी किसलेले चीज
कृती : प्रथम एका पारेल्यात पुरेसे पाणी घालून त्यात छोले टाकून शिजवून / वाफवून ठेवा. एका स्वतंत्र पातेल्यात पाणी घालून त्यात निवडलेला पालक घालून तोही शिजवून घ्या व मग मिक्सरमधून वाटून त्याची प्यूरी बनवून घेऊन त्यात लिंबाचा रस मिसळा.
गॅसवर एका फ्राय पॅनमध्ये फोडणीसाठी तेल गरम करून घेऊन त्यात एक तमालपत्र घालून तळून घ्या व नंतर त्यात जिरे टाका. जिरे चांगले तडतडल्यावर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून परतून घ्या. मग त्यात धने पूड व गरम मसाला घाला. शेवटी त्यात उकडून ठेवलेले काबुली चणे आणि मिक्सरमधून बनवून ठेवलेली पालकाची प्यूरी घालून मिक्स करून घ्या आणि पांच मिनिटे शिजवून घ्या व गॅस बब्द करा. झाले आपले पालक-छोले तय्यार !

About Author