शेतकरीविरोधी कायदा रद्द होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही : माजी आ.सिध्दाराम म्हेत्रे

। अक्कलकोट : प्रतिनिधी
जुन्या जमान्यातील सरंजामशाही आणुन देशातील 90 टक्के लोकांना गरीब ठेऊन गुलामगिरी लादायचा भाजपाचा कुटील डाव आहे. हे आधुनिक इंग्रज शेतकरी यांना वेठीस धरून शेतकर्यांना गुलामगिरीत ठेवण्यासाठी शेतकरीविरोधी काळा कायदा केला आहे. हा कायदा रद्द होईपर्यंत काँग्रेस स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी केले. येथील प्रमिला पार्क काँग्रेस कार्यालयात मंगळवारी दुपारी आयोजित बैठकित म्हेत्रे बोलत होते.
या शेतकरी विरोधातील काळ्या कायद्याविरोधात 2 आँक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता येथील तहसिल कार्यालयासमोर काँग्रेस तर्फे एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले, संंसदेत व राज्यसभेमध्ये शेतकरी विरोधातले तीन विधेयके भाजपा सरकारने घाईगडबीने मंजुर करून राष्ट्रपती कडे पाठविले. सर्व विरोधी पक्षाने विरोध करूनही राष्ट्रपतीने सही केल्याने आता त्याचे कायद्यात रूपांतर झाले आहे. शेतकरी विरोधी काळा कायदा शेतकर्यांचे खुप नुकसान करणार आहे. याला विरोध म्हणून देशातील सर्व शेतकरी लोकशाही मार्गाने विरोध आंदोलन करत आहेत.त्याचाच एक भाग म्हणुन विविध मार्गाने या काळ्या विधेयकाविरूद्द काँग्रेस तर्फे देशभर आंदोलन छेडले असुन हे कायदा मागे घेईपर्यंत गप्प बसणार नाही. शेतकरी हा देशाचा कणा आहे. 75 टक्के अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे. शेतकर्यांची दुर्दशा झाली आहे. ते जागृत आहेत पण संघटित नाहीत. शेतकरी विरोधी या विधेयकांना हाणुन पाडण्यासाठी 2 आँक्टोबरच्या एक दिवसीय धरणे आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले. धरणे, आंदोलन, सह्यांचे निवेदन, असहकार असे टप्याटप्याने भविष्यात आंदोलन होणार आहे.
यावेळी सभापती सुनंदा गायकवाड, उपसभापती प्रकाश हिप्परगी, श्रीशैल नरोळे, धानेश आचलेरे, मल्लिकार्जुन काटगांव, गफुर शेरीकर, सिद्धार्थ गायकवाड, अश्पाक बळोरगी, रईस टिनवाला, महिला तालुकाध्यक्ष मंगल पाटील, शहराध्यक्ष सुनिता हडलगी, काँग्रेसचे शहराध्यक्ष भिमाशंकर कापसे आदींची प्रमुख उपस्थिती होती. अश्पाक बळोरगी यांनी स्वागत व प्रास्तविक केले.यावेळी विलास गव्हाणे, वकिल बागवान,पंचायत समिती सदस्य अँड,आनंद सोनकांबळे, शशिकांत शटगार, सद्दाम शेरीकर, चंदन आडवितोटे, राजशेखर लकाबशेट्टी, बसवराज माशाळे, सातलिंग गुंडरगी, काशिनाथ गोळ्ळे, मोहन देडे, सुनिल खवळे, सुधीर सोनकवडे, रामचंद्र समाणे, श्रीशैल अळ्ळोळी, सायबु गायकवाड, शाकीर पटेल, बबन पवार, शिवशरण इचगे, बसवराज अळ्ळोळी, रमेश चव्हाण, महादेव चुंगी, सर्फराज शेख, शबाब शेख, विश्वनाथ हडलगी, अलिबाशा अत्तार, दिलीप बिराजदार, सागर कोळी, बाबन जमादार, मुबारक कोरबु आदीसह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. व्यापारी , शेतकरी कामगार सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहान केले.सुत्रसंचालन दिलीप बिराजदार यांनी केले. तर आभार मुबारक कोरबु यांनी मानले.