बोरगाव दे. येथे लंपी रोगावर प्रतिबंधात्मक लसीकरण शिबीर

। अक्कलकोट : प्रतिनिधी
बोरगाव दे. (ता. अक्कलकोट) येथे ग्रामपंचायत व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने लंपी प्रतिबंधक लसीकरण शिबीर घेण्यात आले. याप्रसंगी सरपंच विलास सुरवसे यांच्या पुढाकाराने डॉ. संतोष कर्हाळे यांच्या नेतृत्वाखालील टीमने सदर शिबिरात तपासणी व लसीकरण केले.
यावेळी डॉ. कर्हाळे यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन करताना लंपी हा आजार माश्या व डासांच्या प्रादुर्भावामुळे उद्भवत असून पायावर सूज येणे, फोड येणे, ताप इत्यादी लक्षणे आढळून येत आहेत. सदर आजार हा संसर्गजन्य आजार असून शेतकर्यांनी जनावरे बांधताना सुरक्षित अंतर राखून बांधावीत व पुरेशी काळजी घ्यावी असे आवाहन केले.
यावेळी बोरगाव मधील 250-300 जनावरांची तपासणी करून लसीकरण करण्यात आले. यावेळी उपसरपंच राजेभाई मुजावर, ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण भैरामडगी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, संतोष बिराजदार, करीम मुजावर, सचिन जिरगे, भागेश जिरगे व शेतकरी उपस्थित होते.
शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉ. कोंडे, कंपाउंडर काळे, सहायक समर्थ सलगरे आदींनी परिश्रम घेतले.