डॉ.संतोष खुबा डी.एम. वैद्यकीय परिक्षेत 28 वा क्रमांकाने उत्तीर्ण

Dr. Santosh Khuba

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील किणीचे सुपुत्र डॉ. संतोष खुबा यांची वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात मोठी पदवी समजली जाणारी D.M. (DOCTOR­TE OF MEDICINE) Super Specialty Clinical Haematology
या वैद्यकीय शिक्षणासाठी संपूर्ण देशातून 28 वा क्रमांकावर उत्तीर्ण झाल्याबद्दल तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
डॉ. संतोष विजयकुमार खुबा यांचे प्राथमिक शिक्षण काजीकणबस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सहावी-सातवी मल्लिकार्जुन विद्या विकास प्रशाला किणी, आठवी ते दहावी श्री बसवेश्वर प्रशाला काझीकणबस, आठवी-नववी दहावीला असताना आजोबा चन्नवीरअप्पा बाबाराव खुबा यांचे खूप मोलाचं मार्गदर्शन लाभले.
सन 2004 सालात दहावीमध्ये 76 टक्के, अकरावी-बारावी सायन्स मॅथ्स आणि बायोमध्ये दयानंद कॉलेज सोलापूर येथे 80 टक्के गुण घेवून उत्तीर्ण झाले असून सी.ई.टी. देखील पास झाले. त्यानंतर एम.बी.बी.एस. पदवी घेतल्यानंतर शासकीय कोट्यातून बी.जे. मेडिकल कॉलेज व ससून रुग्णालय,पुणे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र वागदरी येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून पाच महिने सेवा केली. एम.बी.बी.एस. नंतर एम.डी मेडिसिन शासकीय कोट्यातून भावनगर गुजरात येथे तीन वर्ष पूर्ण केले. एम.डी मेडिसिन झाल्यानंतर सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे एक वर्ष सेवा बजावली. कोरोनासाठी परत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पंधरा दिवस सिव्हिल हॉस्पिटलमध्ये परत कोरणाची ड्युटी केले व आता सध्या डॉक्टर मुदकण्णा यांचे स्पर्श हॉस्पिटल येथे कोरोनाच्या पेशंटची सेवा बजावत आहेत. कुठलेही क्लास व पुस्तक उपलब्ध नसताना देखील ऑनलाइनव्दारे माहिती मिळविून अभ्यास करत हिमातोलॉजी या विषयांमध्ये डी.एम. साठी एन्ट्रन्स पास झाले. सदरील परिक्षेत संपूर्ण भारतात 28 वा क्रमांकाने उत्तीर्ण झाले. महाराष्ट्रातील फक्त तीनच व्यक्ती यामध्ये निवडले आहेत आणि संपूर्ण देशातून 55 जागा याकरिता होते. क्लीनिकली हेमॅटोलॉजी (रक्ताच्या आजाराविषयी तज्ञ) मेडीकल क्षेत्रातील सर्वोच्च पदवी यानंतर कोणतही पदवी नाही. ग्रामीण भागातून आलेली व्यक्ती प्रतिकूल परिस्थितीत आर्थिक परिस्थिती नसताना देखील खुल्या प्रवर्गातून कुठले क्लासेसला पैसे न घालता परिश्रमाच्या जोरावर व बुद्धिमत्तेच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

About Author