2024 चा अक्कलकोटचा आमदार राष्ट्रवादीचा असेल : बळीराम साठे

तालुकाध्यक्ष दिलीप सिध्दे व राष्ट्रवादी शहराध्यक्ष मनोज निकम यांना पक्षाची ताकद देणार
। अक्कलकोट : प्रतिनिधी
मागील वीस वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विस्तारासाठी अक्कलकोट तालुक्याच्या तात्कालीन नेतृत्वाकडून विशेष प्रयत्न न झाल्याने पक्षाची वाढ़ खुंटलेली होती. त्यामुळेच नव्या दमाच्या तरुणांना पदे देऊन राष्ट्रवादीची नवी टीम सक्रिय केली आहे. येणार्या काळात या पदाधिका़र्यांनी पवार यांच्या विचारांचा अजेंडा घराघरात पोहोचवल्यास 2024 चा अक्कलकोट चा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल असा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी व्यक्त केला.
अक्कलकोट येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका़र्यांना नियुक्ती पत्र वाटप व सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा उपाध्यक्ष महेश माने, जेष्ठ नेते सुरेश सूर्यवंशी, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दिलीप सिध्दे, शहराध्यक्ष मनोज निकम, बाबासाहेब निंबाळकर, सलीम यळसंगी, महिला अध्यक्षा माया जाधव उपस्थित होते.
प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्याध्यक्ष माणिक बिराजदार यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी पुढे बोलताना साठे म्हणाले अडचणीच्या काळात अनेकजण पक्ष सोडून गेले तरी पवार यांनी न डगमगता पक्षाला उभारी दिली. आज सत्ता आहे. या सत्तेचा उपयोग सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी झाला पाहिजे याकरिता प्रत्येक कार्यकर्त्याने झटून काम करण्याची गरज आहे. कोणतेही विकासाचे काम अडल्यास माझ्याशी संपर्क करा. मी स्वतः लक्ष घालून काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करेन.
नूतन जिल्हा उपाध्यक्ष महेश माने यांनी महाराष्ट्रात सर्वत्र भरारी घेणार्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अक्कलकोट मध्ये आलेली मरगळ नव्या पदाधिकाऱयांच्या प्रयत्नांनी निश्चित दूर होणार असून याद्वारे अक्कलकोट च्या विकासाची खर्या अर्थाने सुरुवात झाली असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.
यावेळी सुरेश सूर्यवंशी, दिलीप सिद्धे, बाबासाहेब निंबाळकर, मनोज निकम, शंकर व्हनमाने,अर्जुन बनसोडे, इस्मनिकम प्रा. ज्ञानेश्वर शिरसाट, आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी शहर तालुक्यातील नूतन पदाधिकाऱयांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे संचालक प्रशांत भगरे, धनाजी मोरे, व बादोले येथील धायगोडे व सलगरे या सैन्यात सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या जवानांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुका उपाध्यक्ष रतन बंगरगी, मैंदर्गी शहर अध्यक्ष राहुल किरनळ्ळी, महादेव वाले, राजरतन बाणेगाव, संजय घोडके, शीतल फुटाणे, अमरदीप साखरे, प्रथमेश पवार, मजहर बागवान, राजाभाऊ नवले, सनी सोनटक्के, प्रवीण देशमुख, आकाश शिंदे, रमेश म्हमाणे, आकाश गडकरी, स्वामीनाथ पोतदार, श्रीनिवास सिंदगीकर, अविराज सिद्धे, बाळासाहेब वाघमोडे, श्रीशैल चितली, नवनीत राठोड, रफिक मुजावर, उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. प्रकाश सुरवसे यांनी केले.
राष्ट्रवादी च्या विस्तारासाठी मी कटिबद्ध असून येणार्या काळात नगरपालिका, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत पक्षाची ताकद दिसेलच. त्यासाठी सर्वाना सोबत घेऊन ग्राउंड लेवल वर राष्ट्रवादी च्या विस्तारासाठी प्रयत्नशील राहीन. – दिलीप सिद्धे, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस.
अक्कलकोट शहरांत राष्ट्रवादी काँग्रेस ची वार्डनिहाय बांधणी करत असून येणार्या नगरपरिषद निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळेल यासाठी अहोरात्र झटून पक्ष वाढवणार आणि अक्कलकोट शहरातील विविध प्रश्न वरिष्ठ पातळीवर मांडून रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहु.
– मनोज निकम, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.