हालहळ्ळी येथे कोळी समाज संघटनेच्या नामफलकाचे उद्घाटन

। हालहळ्ळी : प्रतिनिधी
कोळी समाजावर गेल्या अनेक वर्षापासून विविध पक्षाकडून अन्याय झालेला आहे. यापुढे अन्याय होवू देणार नाही. समाजाच्या पाठिशी राहून सर्व समस्या सोडविण्यासाठी कटीबद्द असल्याचे प्रतिपादन नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांनी केले.
ते अखिल भारतीय कोळी समाज संघटनेवतीने सिद्धार्थ कोळी ह्यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट तालुक्यात हालहळ्ळी व चपळगाव येथे महर्षी वाल्मिकी ऋषींच्या जयंतीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कल्याणशेट्टी बोलत होते. या कर्याक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नाटक राज्याचे संजयकुमार उकली तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी हे होते. यावेळी वाल्मिकी ऋषींचे प्रतिमा पूजन, नामफलकाचे शुभारंभ व प्रसाद वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी चपळगाव येथे गावात मिरवणूक काढण्यात आले. राज्य समनव्यक अंबादास कोळी यांचे जाहीर सत्कार करण्यात आले.
यावेळी सोलापूर कोळी समाजाचे नेते अशोक निंबर्गी, नागेश बिराजदार, राज्य समनव्यक अंबादास कोळी, जिल्हा युवा अध्यक्ष राविकुमार यलगुलवार, जिल्हा युवा कार्याध्यक्ष सिद्धाराम कोळी, तालुका कर्मचारी अध्यक्ष -मल्लिकार्जुन देशमुख, तालुका युवा अध्यक्ष शरण करजगी, तालुका सल्लागार दत्ता कोळी, राजकुमार खानापूरे, डॉ.सतीश कोळी, सोमनाथ कोळी, अनिल जमादार, गुंडपा कोळी, सतीश करजगी, विजय कोळी तालुक्यातील अनेक युवा बांधव उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा युवा उपाध्यक्ष-मल्लिनाथ कोळी, तालुका युवा उपाध्यक्ष-करण भाऊ कोळी, राजकुमार कोळी, इरणा कोळी, परशुराम कोळी, तानाजी कोळी, शंकर कोळी, महेश कोळी, काशिनाथ कोळी, प्रशांत कोळी असे इतर अनेक चपळगाव चे समाज बांधव परिश्रम घेतले.