हन्नुर येथील प्रलंबित शेतातील वहिवाट रस्ताचा निकाल शेतकर्यांच्या संमतीने लागला

। हन्नूर : प्रतिनिधी
हन्नूर येथील वर्षानुवर्ष प्रलंबित असणारा वहिवाट रस्त्याचा निकाल लागला असून सदर हा शेतकर्यांच्या पूर्व संमतीने निर्णय झाला आहे. हन्नुरचे ज्येष्ठ नेते सिद्धेश्वर कल्याणशेट्टी यांच्या मध्यस्थीने हा निर्णय झाला आहे. हा रस्ता गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित होता, यातून दीडशे शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावे लागत होते. त्यामुळे आता या शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर या रस्त्याची स्थळ पाहणी करण्यासाठी अक्कलकोट तहसीलदार अंजली मरोड यांनी या सर्व शेतकर्यांचा अभिनंदन केले आहे. आणि या सर्व शेतकर्यांनी आणि तालुक्यातील सर्व शेतकर्यांनी या संमतीचा आदर्श घ्यावा असा सल्ला तहसीलदार अंजली मरोड यांनी केला आहे. हा वादी मल्लिनाथ बसपा हेगडे, शिवा धानाप्पा हेगडे, गुरूलिंगप्पा धानाप्पा हेगडे व प्रतिवादी शिवाप्पा सिद्राम भरमशेट्टी यांच्यातल्या संघर्षामुळे सदर परिसरातील शेतकर्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जाण्याची वेळ आली होती. तरीही या सर्वांनी सहमतीने या रस्ता वहिवाट यासाठी दिली आहे. त्यामुळे सर्व शेतकर्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. यावेळी हन्नूर उपसरपंच सागर दादा कल्याणशेट्टी सिद्राम पुजारी, शरणाप्पा हेगडे मल्लिनाथ हेगडे, शिवप्पा भरमशेट्टी, कल्लाप्पा बकरे आदी उपस्थित होते, यावेळी तलाठी दत्तात्रय पांढरे, मंडलाधिकारी कोळी, कोतवाल रेवणसिद्ध सुतार, श्रीशैल बाळशंकर, वंचित बहुजन आघाडी जि.उपध्यक्ष युवराज बाळशंकर, राहुल साठे, नारायण इरवाडकर, जनार्दन राजगुरू, अनिल तळवार, दिंगबर साठे आदी शेतकरी उपस्थित होते.