स्व. सातलिंगप्पा म्हेत्रे हे सर्वसामान्यांचे नेते होते

dudhani.jpg1

। दुधनी : प्रतिनिधी

ज्येष्ठ नेते सातलिंगप्पा म्हेत्रे यांनी दुधनीतील व्यापार्‍यांच्या कल्याणासाठी आयुष्य वेचले. ते प्रेरणा देणारे सर्वसामान्यांचे नेते होते, अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या. दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सातलिंगप्पा म्हेत्रे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दुधनी बाजार समितीमध्ये शोकसभा झाली.

यावेळी बाजार समितीच्या सर्व संचालक व अधिकारी कर्मचार्‍यांच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपसभापती सिध्दाराम बाके, संचालक शंकर म्हेत्रे, पी.के. व्होसुरे, बी.बी.आळगी, बी.एस. तळवार, एम.पी.पाटील, एस. सी.अरबाळे, गीताबाई कौलगी, राजश्री पाटील, ए.एम.ढंगापुरे, जी.डी.डोंगरीतोट, चंद्रकांत कामजी यांच्यासह व्यापारी व अडते, मुनीम, तोलार, हमाल आदी उपस्थित होते. प्रारंभी म्हेत्रे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष परमशेट्टी म्हणाले, म्हेत्रे यांनी पन्नास वर्षे दुधनीचे नगराध्यक्ष म्हणून काम केले. आयुष्यभर नगराध्यक्ष व सभापतिपदाच्या माध्यमातून समाजकार्य केले, शिवाय समाजापुढे जनता दरबारच्या माध्यमातून न्यायनिवाडा करण्याचा वेगळा आदर्श निर्माण केला. त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रसन्न होते. ते कार्यकत्यांना प्रेरणा देणारे होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव स्वामीनाथ स्वामी यांनी केले.

About Author