स्नेहलोक मल्टीपर्पज निधी लिमिटेडच्यावतीने रक्तदान शिबिर

sneha lok

। अक्कलकोट : प्रतिनिधी
बदलाची सुरुवात ही आपल्या स्वतः पासून करायची असते..! या वाक्याला शोभेल असे व्यक्तिमत्त्वाचे आज दर्शन घडले अचानक पणे अश्विनी रुरल हॉस्पिटल ब्लड बँक चे सांगण्यावरून रक्ताचे तुटवड्यामुळे रुग्णांचे ऑपरेशन व पुढील उपचार करण्यासाठी अडथळा होत आहे यासाठी त्वरित रक्तदान शिबिर आयोजन करून होईल तेवढे रक्त संकलन करून मिळावे या त्यांच्या विनंतीनुसार आज स्नेहलोक मल्टीपर्पज कॉपरेट निधी लिमिटेड च्या वतीने रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले या शिबिरास निवृत्त कृषी सहाय्यक चंद्रकांत कालिबत्ते यांनी आपल्या वयाच्या 61 व्या वर्षी सुद्धा समाजासाठी आपण कधीही पुढे राहून कोणत्याही प्रकारचे काम असो किंवा जनसेवा असो त्यामध्ये आपल्याला कसे शक्य तेवढे मदत करता येईल या त्यांच्या जीवन जगण्याचा मूलमंत्राप्रमाणे त्यांनी आज या कोरोनाचं कठीण परिस्थिती मध्ये सुद्धा वयाची पर्वा न करता रक्तदान करून या ग्रामीण समाजासाठी एक मोठे बदलाची सुरुवात स्वतःपासून केली आणि खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचे नूतन मराठी प्राथमिक विद्यालयचे मुख्याध्यापक अशोक गुरव यांनी आपले वाढदिवस रक्तदान करून साजरा केले. तसेच 40 रक्तदात्यांनी रक्तदान करून प्रतिसाद दिल्याबद्दल संस्थेचे चेयरमन काशिराय पाटील व डायरेक्टर धर्मराज भोसागी, सिद्धराम कालिबत्ते व इतर सहकारी वर्ग तसेच मित्र मंडळ यांनी रक्तदात्यांच आभार वक्त केले.

About Author