सोलापूर येथे युवा उद्योजक महादेव कोगनुरे यांचे एम.के.फाऊंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना

m k

। सोलापूर : प्रतिनिधी
केगांव खु, सारख्या एक छोट्याश्या गावातून माझा प्रवास सुरू झाला. बालपण खूप खडतर आणि अनेक अडचणीचा गेला. संघर्ष तर माझ्या पाचवीलाच पुजला होता.धडपडत, संघर्ष करत सुरू झालेला प्रवास आज इथवर येऊन पोहोचलाय,माझ्या मागील जीवनाबद्दल जास्त काही सांगणार नाही, कारण परवाच्या मुलाखतीतुन आणि माझ्या संपर्काच्या माध्यमातून आपणांस सर्व ज्ञात आहेच.
माझ्या जीवनाला खरी ओळख जर कुठे मिळाली असेल तर ती सागर सिमेंटच्या क्षेत्रात मिळाली आहे, हे नाकारून चालणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या व्यवसायात स्थिरावल्यावर समाजात अडचणीत असणार्‍या गरीब आणि सामान्य माणसाला मदत करण्याची छंद पडला. एकवेळच्या जेवणासाठी धडपडणार्‍या माझ्यासारख्या माणसाला देवांने आज खूपसारं दिलेला आहे. माघे वळून पाहताना जे सोसलोय, जे भोगलोय याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही.पण मला ज्या अडचणी आल्या त्या अडचणी समाजात अनेक लोकांच्या वाट्याला आलेला असेल,त्या येऊ नयेत आणि आल्यातर,त्यांना त्या अडचणीतुन बाहेर काढण्यासाठी मी अनेक वर्षांपासून निस्वार्थी भावनेने मदत करत आलोय.
कधी-कधी एखादा माणूस आई, वडील,पत्नी किंवा मुलं दवाखान्यासाठी ऍडमिट आहेत म्हणून पैशाच्या मदत घ्यायला यायचा.कोणाच्या नोकरीसाठी मदत हवी असायची,एखाद्या गावात धार्मिक कार्यक्रमात अन्नदान सेवा हवी असायची,लोकांनी गावात सामूहिक विवाहाचे आयोजन केली असेल तेथे जेवणासाठी मदत हवी असायची, आपत्ती काळात घर उद्धवस्त झाल्यावर पुन्हा संसार उभा करण्यासाठी पत्रे किंवा संसारउपयोगी साहित्याची गरज भासायची, कुष्ठरोग वसाहतीत अन्नधान्याची गरज भासायची, अंध अपंग मुलांना शिक्षणासाठी सहकार्य पाहिजे,शेतकर्‍यांना मदत असो, तर कोणाला गावात मंदिर बांधतोय म्हणून सिमेंट दान म्हणून पाहिजे, सातारा सांगली येथे पूरग्रस्तांना मदत असो किंवा कोरोना काळात गरीब लोकांना केलेला अन्नधान्याची मदत असो, सागर सिमेंटच्या माध्यमातून नोकरीला लावणे असो किंवा व्यवसायात मदत असो अश्या एक नाही तर हजारो काम माझ्या लक्षात सुद्धा नाहीत त्या यापूर्वीच्या कालखंडात माझ्या हातून घडल्या याचा नेहमी समाधान राहीलच.या सर्व गोष्टी सहजतेने घडण्यामागे कारण एवढाच आहे कि,मी सुद्धा त्याचं परिस्थितीतुन आलोय.आपण दुसर्‍यांच्या कामी पडतोय याचा अभिमान नेहमी वाटायचा.
आज सकाळी दसर्‍याच्या मुहूर्तावर पूज्य अप्पाजींच्या शुभहस्ते आमच्या नवीन अश्या च् घ र्ऋेीपवरींळेप या सामाजिक संस्थेचा उदघाटन संपन्न झाला. आज संस्थेच एक छोटंसं रोपटं लावतोय, भविष्यात त्याचे वटवृक्षात रुपांतर झालेलं आपणांस दिसेल.जनसेवा हिचं ईश्वर सेवा हे ब्रीद मानून गेल्या 8-10 वर्षांपासून सामाजिक जाणिवेतून जे कार्य करत आलोय यात कुठेही खंड पडू न देता, अखंड पणे पुढे ही च् घ र्ऋेीपवरींळेप च्या माध्यमातून अजून जोमाने काम करणार आहे. समाज हिताचं, समाज सेवेच जे व्रत हाती घेतलंय, त्याला कुठेही तडा जाऊ देणार नाही.यासाठी तुम्हा सर्वांची साथ राहील ही अपेक्षा आहे. जास्त काही तोंडीच बोलण्यापेक्षा कार्याच्या माध्यमातून बोलत राहू, आणि भेटत राहू.
मोठ्या उत्साहात नव्या संस्थेचा उदघाटन समारंभ संपन्न झाला. अप्पाजींसमवेत माजी नगरसेवक चंद्रकांत रमणशेट्टी, ानंद लोणावत, हत्ती मालक, सोमनाथ होसाळे, राजू रोडगीकर, ी स्वामी साहेब आदी मंडळी या समारंभाला उपस्थित होती.
माझे यापूर्वीचे कार्य पाहून,पुढील काळात मला प्रोत्साहन मिळावा यासाठी आमच्या नवीन अश्या संस्थेला आनंद लोणावत यांनी 51000 हजाराची आणि सोमनाथ होसाळे यांनी 11000 हजाराची देणगी दिले.

About Author