सोलापूरच्या पोलिस अधिक्षकपदी तेजस्वी सातपुते

। सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर ग्रामीण पोलिस अधिक्षक म्हणून साताराच्या पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांची अहमदनगर येथे बदली झाल्यानंतर सोलापूर ग्रामीण पोलिस अधिक्षक या पदावर कोणाची नियुक्ती होणार याची सर्वांना उत्सुकता होती. तेजस्वी सातपुते यांचा शिक्षिकेची मुलगी ते आयपीएस असा प्रेरणादायी प्रवास झाला आहे.
मनोज पाटील यांच्या बदलीनंतर अप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांच्याकडे पदभार देण्यात आला होता. तेजस्वी सातपुते या सध्या सातारा येथे पोलिस अधिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्याठिकाणी त्यांनी सकारात्मक कामगिरी केली आहे. सातारा येथे येण्यापूर्वी त्या पुणे शहर येथे उपायुक्त म्हणून सेवा बजाविली आहे.
तेजस्वी सातपुते या मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावच्या. आई कृष्णाबाई प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या तर वडिल बाळासाहेब व्यावसायिक. 2009 साली त्यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी सुरु केली होती. दुसर्या प्रयत्नात 2012 साली देशात 198 क्रमांक मिळवून त्या आयपीएस झाल्या. स्पर्धा परिक्षेत यश संपादन केल्यावर त्यांचे लग्न किशोर रक्ताटे यांच्या सोबत झाले.
सातारा येथे त्यांनी कोरोना काळात चांगली सेवा बजावली आहे. गेल्याच आठवड्यात त्यांनी झी चोवीस तास यांच्याकडून गौरविण्यात आले आहे. शुक्रवारी सोलापूर अधिक्षक पदाचा पदभार घेणार असल्याचे सांगण्यात आले. त्या पहिल्या सोलापूरच्या महिला पोलिस अधिक्षक ठरल्या आहेत.