सोलापूरच्या चादरींची ऊब अनुभवली पूरग्रस्त नागरिकांनी

solapur

। अक्कलकोट : प्रतिनिधी
महापुराचे फटका बसलेल्या बोरी नदी काठच्या चार गावाना रोटरी क्लब ऑफ सोलापूर (एमआयडीसी) व अक्कलकोट रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल 300 कुटुंबाना चादरी वाटप करण्यात आले. यामुळे पूरग्रस्तांना दिलासा मिळाला आहे.
या मदतकार्यासाठी रोटरी सदस्यांना व मित्र परिवाराला आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत दोन्ही क्लबच्या अध्यक्ष व सचिवांनी आपल्या क्लब सदस्यांसोबत चर्चा करून तत्पर मदतीची योजनेला प्रतिसाद दिली. त्याला सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नुकतेच क्लबतर्फे ज्या आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला, त्यातील अनेकांनी आपापल्या परीने हातभार लावला.
रामपूर, गौडगाव, इटगे, मिरगजी या चार गावातील पुरग्रस्तांना जाऊन चादरीचे मदत देण्यात आली. रोटरीच्या सोलापूरी चादरींची ही प्रेमाची ऊब आम्ही कधीही विसरणार नाही, असे भावनिक उदगार ग्रामस्थांनी यावेळी काढले.
यावेळी रामपूर, इटगे,मिरजगी या पूरग्रस्त गावातील 300 पूरग्रस्त नागरिकांना सोलापुरी चादरीचे वाटप करण्यात आले. यावेळी रोटरी एमआयडीसी अध्यक्ष रो. प्रा. विठ्ठल वंगा, सचिव शंकर गुंडला, अक्कलकोट रोटरी क्लब अध्यक्ष जितेंद्रकुमार जाजू, सचिव ऍड सुनिल बोराळकर, आनंद जंगम, गोवर्धन चव्हाण, गणेश ईराबत्ती, शंकर पेरमल, रमेश कमटम यांच्यासोबत, रो सोनल जाजू , उपसरपंच रोहिणी फुलारी आदी उपस्थित होते.
सिद्धेश्वर गड्डम, चार्वाक बुर्गुल, कालिदास माणेकरी,श्रीनिवास इट्टम, राजेंद्र नंदाल, दिनेश रापेल्ली, अरुण शेगूर, बुचय्या गुंडेटी, अंबादास दिकोंडा, रवी जाधव आदींनी मदतीसाठी सहाय्य केले.

About Author