सातनदुधनी येथील रक्तदात्यांना भेट वस्तू प्रदान

Satandudhani

। सातनदुधनी : प्रतिनिधी
गेल्या 3-4 महिन्याच्या मागे कोरोना च्या काळात कोरोना रूग्णांची संख्या ही महाराष्ट्रात अफाट वेगाने वाढत होती. त्याच वेळी एन वेळेस रूग्णांना रक्ताची उपलब्धता कमी जाणवत होती. त्या अनुषंगाने सातनदुधनी गावातील तरुण नवयुकांनी पुढे त्या काळात रक्तदान केले. जवळपास 40-45 जणांनी रक्तदान केले, आणि त्याच रक्तदानाच्या मोबदल्यात त्यांना पोचपावती म्हणून आज रक्तदात्यांना हेल्मेट, पाण्याचे झार, घड्याळ, अशी वस्तू आदरपूर्वक साकार करण्यात आली.
यावेळी सरपंच विठ्ठलराव खताळ, पोलीस पाटील महादेराव पाटील, तंटामुक्त अध्यक्ष कोनाप्पा शिंदे, ग्रामपंचायत सदस्य रतन राठोड आणि सर्व रक्तदाते व ग्रामस्थ उपस्थित होते.

About Author