सांगवीचे पुनर्वसन करण्याची ग्रामस्थांची मागणी

। सांगवी : प्रतिनिधी
अतिवृष्टीनंतर कुरनुर धरणातून पाणी सोडल्याने सांगवी गावाला पुराचा फटका बसला. नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरले.त्यामुळे ग्रामस्थांना स्थलांतरित व्हावे लागले. परिणामी जीवितहानी टळली. दरम्यान, ग्रामस्थाना जिवाच्या भीतीने हातात सापडेल ते घेऊन सैरावैरा अंधारात धावावे लागले त्यामुळे या गावाचे पुनर्वसन करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.
घरातील सर्व वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अन्न धान्य भिजले आहे. सर्व विद्युत उपकरणे भिजून नादुरुस्त झाली आहेत. दरवर्षी पावसाळ्यात या गावाला पुराच्या संकटाला सामोरे जावे लागेल. त्यासाठी ग्रामस्थांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली असून, तातडीने पुनर्वसन व्हावे, व तत्काळ मदत ही मिळावी विशेष म्हणजे हिंदू व मुस्लिम स्मशानभूमी पूर्णपणे वाहून गेली आहे. तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.