सर्वांनी मास्कचा वापर करावा अन्यथा दंडात्मक कारवाई होणार : पो.नि.कलप्पा पुजारी

Kallappa Pujari

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट येथे मास्कवर पोलिसांच्या चुकीच्या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त, पोलिस प्रशासन मस्त अशी स्थिती सध्या तालुक्यात चालु असल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.
कोरोना कोवीड-19 च्या वैश्विक संसर्गजन्य रोगाला आळा घालण्यासाठी कर्तव्यदक्ष ग्रामिण पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी सोलापूर ग्रामिण पोलिस अधिक्षकाचा पदभार घेतल्यानंतर प्रथमत: श्री स्वामी समर्थांच्या नगरीत अक्कलकोट येथील उत्तर पोलिस ठाणे व दक्षिण पोलिस ठाणे भेट देवून येथील पोलिस प्रशासनाच्या कामकाजाचे पाहणी केली आणि पुढील वाटचाल कसे असावे याबाबत सूचना दिली. यामध्ये मास्कची सक्ती, गुंडागर्दीमुक्त, महिला सुरक्षिततेवर भर देवून कामकाज करावे असे आदेश दिले होते. मास्क सक्तीवर अधिक भर देण्याचे आवर्जुन सांगितले असल्याने पोलिसांची कारवाई सध्या शहरात, तालुक्यात धुमधडाक्यात होत असल्याचे पहायला मिळत आहे. या आदेशाची काही ठिकाणी स्वागत तर काही ठिकाणी विरोध होतानाही पहायला मिळत आहे. सततच्या मास्क वापरण्याने अनेकांना श्वसनाचे त्रास होत असल्याने मास्क वापरणे टाळत आहे. मात्र पोलिसांनी कारवाई करताना मास्क लावले पण नाकाला लावले नाही म्हणून त्यांच्यावर कारवाई करणे हे अत्यंत चुकीचे आहे. अशांना नाकावर मास्क लावण्याची सूचना करुन दंड न करता मुक्त करावे.
पोलिसांनी वाहनावर फिरणार्‍या प्रत्येक वाहनचालकांना मास्कची सक्ती करीत आहेत. याबरोबरच बिनामास्कचे पायी फिरणार्‍या, गर्दीच्या ठिकाणी वावरणार्‍या, प्रत्येक दुकान, बँक, शहरातील विविध शासकीय कार्यालय येथे मास्कचे वापर करणे बंधनकारक करावे. तरच कोरोनाला रोखण्यास मदत होईल. अन्यथा वाहनचालकांवर मास्कचे कारवाई करणे म्हणजे पैसे गोळा करण्याचे धंदा होवू नये, पोलिसांचेही जाचक नियम सर्वांसाठी असावे फक्त वाहनधारकांसाठीच असू नये अशी संतप्त प्रतिक्रिया शहर व तालुक्यातून होत आहे.

केवळ दुचाकी विनामास्क वाहन चालविणार्‍यांवर कारवाई करतो हे नागरिकांची गैरसमज आहे. आम्ही दुचाकी, चारचाकी, पायी चालणारे, गर्दीच्या ठिकाणी वावरणारे, दुकान, कार्यालय आदी ठिकाणी विनामास्क आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करीत आहोत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्यासाठी व प्रशासनाला मदत करण्यासाठी म्हणून प्रत्येकांनी मास्क वापरावे, सुरक्षित अंतराचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करावा, कोणीही दंडास पात्र ठरू नये असे आवाहन पो.नि.कलप्पा पुजारी यांनी केले आहेत.

पोलिसांनी विनामास्क चालवणार्‍या वाहन चालकाला शंभर रुपये दंड आकारले जाते. या दंडापोटी एक मास्क पोलिसांनी वाहन चालकांना द्यावे आणि नुसते वाहन चालकावर कारवाई करुन कोरोना रोखता येणार नाही. वाहन चालकासह विनामास्क पायी फिरणार्‍या, दुकान, मॉल, शासकीय कार्यालय आदी ठिकाणी कारवाई केल्यास कोरोनाला रोखता येणार अन्यथा ही कारवाई म्हणजे पैसा गोळा करण्याचा धंदा होऊ नये.
योगेश पवार, शिवसेना शहर प्रमुख

About Author