संगोगी येथील पन्नासहून अधिक शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे बोरी व हरणा नदीत प्रचंड पाणी आल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील नदी काठच्या गावांना जोरदार फटका बसल्याने अनेक शेतकर्यांचे शेतातील पिकांसह जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संगोगी (ब) येथील शेतकरी खंडप्पा करकी यांचे चार एकर उस, दोन एकर कांदा, दोन म्हैस, एक गाईचे वासरू, पंधरा पोते खत असे सुमारे एक लाखा हून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. यांच्यासह संगोगीतील सुमोर 50 हून अधिक शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्या शेतकर्यांचे पंचनामे करून तात्काळ मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. परतीच्या पावसाने जोरदार बरसल्याने या पावसाचा फटका नदीकाठाच्या रामपूर, बोरी उमरगे, जकापूर, कंठेहळ्ळी, सातनदुधनी, बबलाद, बिंजगेर, तळेवाड, रुध्देवाडीसह संगोगी येथील सुमारे 50 हून अधिक शेतकर्यांचे पिकासह घराची पडझड जनावरे दगावल्याने शेतकरी हतबल झाला आहे. तरी महसूल प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून बळीराजाला आर्थिक मदत करावी अशी मागणी पंचक्रोशीतू होत आहे.