श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यासाचे कार्य आदर्शवत व कौतुकास्पद : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

अक्कलकोट : प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थांचा महिमा दांडगा आहे, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांनी केले.
ते सोमवारी श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे आले असता श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळास सदिच्छा भेट दिले असता या भेटीप्रसंगी बोलत होते.
यावेळी राज्याचे ना.बाळासाहेब थोरात, ना.विजय वड्डेटीवार, ना.दादाजी भुसे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, ना.दत्तात्रय भरणे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आ.प्रणिती शिंदे, माजी राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, आमदार ज्ञानराज चौगुले, सेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे, तालुका शिवसेना प्रमुख संजय देशमुख, राष्ट्रवादीचे ता.अध्यक्ष दिलीप सिध्दे, पंढरपूरच्या सुनेत्रा पवार यांच्यासह प्रशासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी ना.उध्दव ठाकरे यांनी जन्मेजयराजे भोसले यांच्याकडे मास्कचा पाकिट भेट दिले. यावेळी जन्मेजयराजे भोसले यांनी ऋण व्यक्त करुन शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिले.
दरम्यान अक्कलकोट ते सोलापूर रस्त्यावरील जन्मेजयराजे भोसले यांच्या विजयबाग येथे ना.उध्दव ठाकरे यांचे स्वागत अमोलराजे भोसले यांंनी केले. यावेळी खासदार डॉ.जयसिध्देश्वर महास्वामीजी उपस्थित होते.
यावेळी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, खजिनदार लाला राठोड, संतोष भोसले, प्रविण देशमुख, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष मनोज निकम, शहर शिवसेना प्रमुख योगेश पवार, प्रहारचे विजय माने, निखिल पाटील, अप्पा हंचाटे, सुर्यकांत कडबगावकर, शहाजी यादव, संजय गोंडाळ, रोहित खोबरे, गणेश गोब्बुर, अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, सोमनाथ कुलकर्णी, गणेश भोसले, महांत स्वामी, अरविंद पाटील, गोविंदराव शिंदे आदी उपस्थित होते.