श्रीमंत शहाजीराजे भोसले वाचनालयात डॉ. ए.पी.जे कलाम यांची जयंती साजरी

। अक्कलकोट : प्रतिनिधी
श्रीमंत शहाजी राजे भोसले वाचनालयात दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस संस्थेच्या अध्यक्षा शैलशिल्पा जाधव यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. एक सर्व सामान्य कुटुंबातील पेपर वाटप करणारा मुलगा राष्ट्रपती पदाला गवसणी घालू शकतो. याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे डॉ. कलाम. त्यांचा आदर्श प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. शिक्षणा पासुन कोणीही वंचित राहू नये अशी त्यांची तळमळ होती.असे सौ. शैलशिल्पा जाधव यांनी भाषणात सांगितले. या प्रसंगी पुष्पा हरवाळकर, ग्रंथपाल दत्तात्रय बाबर, दिनकर शिंपी, महादेव शिरसाठे, यश जाधव आदि उपस्थित होते.