शेतकर्‍यांना सरसकट मदत मिळावी : प्रा. प्रकाश सुरवसे

prakash

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अतिवृष्टी मुळे शेतकर्‍याची अर्थव्यवस्था कोलमडली असून वारंवार येणार्या संकटांमुळे शेतकरी निराश झाला आहे. या गर्तेतून शेतकर्‍यांना बाहेर काढण्यासाठी सरसकट नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी बोरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने प्रा. प्रकाश सुरवसे यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
पालकमंत्र्याच्या अक्कलकोट दौर्‍यात ही मागणी करण्यात आली. बोरगाव बादोले, घोळसगाव, किरनळ्ळी, पालापूर सह वागदरी जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्वच गावातील शेतकरी वर्गाला या अतिवृष्टी चा मोठा फटका बसला आहे. यामुळे शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले असून ग्रामीण अर्थव्यवस्था कमकुवत बनली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शेतकरी वर्गाला तातडीने मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी शेतकरी वर्ग, गावकरी, उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय दत्ता मामा भरणे यांनी आज अक्कलकोट तालुक्याचा दौरा केला. यावेळी बोरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने बोरगाव, बादोले, घोळसगाव, किरनळ्ळी, पालापूर, सह वागदरी जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्वच गावातील शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे होऊन सर्वाना सरसकट नुकसानभरपाई मिळावी या मागणीचे निवेदन देण्यात आले.

About Author