शेतकरी विरोधी कायदा रद्द होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही : माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे

Congress Morcha

कृषी कायद्याविरोधात काँग्रेसचा ट्रॅक्टर, बैलगाडी भव्य मोर्चा संपन्न

। अक्कलकोट : प्रतिनिधी
केंद्र सरकारने शेतकरी विरोधात पारीत केलेल्या कायद्या मुळे शेतकरी यांचे अतोनात नुकसान होणार आहे. वेठबिगारी सरंजामशाही लादायची कुटील डाव केंद्र सरकारचा आहे. भावी पिढीच्या भविष्यासाठी पेटुन उठा व कामाला लागा. शेतकर्‍यांना गुलामगिरीत ठेवण्यासाठी शेतकरीविरोधी काळा कायदा केला आहे. हा कायदा रद्द होईपर्यंत काँग्रेस स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी केले.
सरकारला जाग यावे व शेतकर्‍यां मधील असंतोष माहित व्हावे म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्यावतीने सोमवारी (2 नोव्हेंबर) दुपारी एक वाजता बैलगाडी व ट्रँक्टर मोर्चा काढण्यात आला व काळा कायदा ताबडतोब मागे घ्यावा असे निवेदन दिले. शेतकरी बैलगाडी, ट्ँक्टर घेऊनमोठ्या संख्येने सामील झाले होते. हा मोर्चा फत्तेसिंह क्रीडांगणापासून प्रारंभ झाला. एवन चौक, बसस्थानक, विजय कामगार चौक, कारंजा चौक, मेन रोड मार्गे फत्तेसिंह चौक, जुना तहसील कार्यालय मार्गे काँग्रेस भवन येथे समारोप झाला. केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषिविधेयकाच्या विरोधात सबंध देशभरात कृषि आंदोलन उभे करण्याच्या अखिलभारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माजी राज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी व ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. अशपाक बळोरगी, मल्लिकार्जुन पाटील यानी मार्गदर्शन केले.
यावेळी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे, जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अश्पाक बळोरगी, पंचायत समितीचे सभापती सुनंदा गायकवाड, उपसभापती प्रकाश हिप्परगी, पंचायत समिती सदस्य अँड आनंदराव सोनकांबळे, धानेश आचलारे, विलासराव गव्हाणे, काँग्रेसचे महिला तालुकाध्यक्ष मंगल पाटील, शहराध्यक्ष सुनिता हडलगी, शहराध्यक्ष भीमाशंकर कापसे, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब पाटील, शहर काँग्रेसचे अध्यक्ष मुबारक कोरबू, नगरसेवक सद्दाम शेरीकर, विकास मोरे ,माजी जिल्हा परिषद सदस्य शिवानंद बिराजदार, दिलीप बिराजदार, अरुण जाधव, वकील बागवान,सुभाष पुजारी, शबाब शेख, शिवू स्वामी, रामचंद्र समाणे, विश्वनाथ हडलगी,सातलिंग गुंडरगी, बबन पवार, सायबू गायकवाड,अप्पू सोनकांबळे, शशी शटगार, काशिनाथ घोडके, सरफराज शेख, काशिनाथ कुंभार, मुकेश कांबळे, शरणप्पा गायगळी, उमरगा मकानदार, नागण्णा दिवटे, निलकंठ मेंथे, राजकुमार लकाबशेट्टी यांच्यासह काँग्रेसचे विद्यमान पदाधिकारी व कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष अरूण जाधव यांनी केले.सुत्रसंचालन दिलीप बिराजदार यांनी केले. तर आभार मुबारक कोरबु यांनी मानले. शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोदवत केंद्र सरकारच्या या कृषि विधेयका विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत आपला विरोध दर्शविला.

About Author