शिवसेनेच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विविध मागण्यांचे निवेदन

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांना शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना अक्कलकोट तालुका शहर यांच्यावतीने अक्कलकोट तालुक्याच्या दौर्यावर आले असता निवेदन देण्यात आले.
निवेदनात अक्कलकोट तालुका हा महाराष्ट्राचा टेलएंडचा तालुका असून गेल्या अनेक वर्षापासून विकासापासून वंचित आहे. शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व.मिनाताई ठाकरे यांनी श्रीक्षेत्र अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांवर मोठी भक्ती होती. आपणही श्री स्वामीभक्त आहात व राज्याचे प्रमुख म्हणून गेल्या अनेक वर्षापासूनचे श्रीक्षेत्र अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील प्रश्ने मार्गी लागतील हा दृढ विश्वास आम्हा शिवसैनिकात आहे. केलेल्या मागण्या पुढील प्रमाणे : श्रीक्षेत्र अक्कलकोटला पाणी पुरवठा सुरळीत होण्याकरीता हिळ्ळी ते अक्कलकोट पाणी पुरवठा योजनेस मंजूरी मिळावी. अक्कलकोट हे दक्षिण भारताचे महाव्दार असून मोठ-मोठे उद्योग, व्यवसायांना चांगली संधी आहे. तरी महाराष्ट्र राज्य औद्योगीक विकास महामंडळाचे पंचतारांकीत एम.आय.डी.सी.व्हावी. श्रीक्षेत्र अक्कलकोट नजीक समर्थनगर ग्रामपंचायती करिता रु. 8 कोटीची पाणी पुरवठा मंजूर असून, त्वरीत कामास सुरुवात व्हावी. श्रीक्षेत्र अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखडा हा राज्यातील टॉप तीर्थक्षेत्राप्रमाणे होऊन त्यास मंजूरी मिळावी.
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळापर्यंत उड्डान पूल व्हावे. श्रीक्षेत्र अक्कलकोट शहरात भव्य क्रिडासंकुलन उभे राहावे. पर्यटन विकास महामंडळाचे रिसॉटचे काम पूर्ण झाले आहे, ते कार्यान्वित करावेत. पर्यटन विकास महामंडळाचे शहरातील अर्धवट कामे पूर्ण व्हावेत. हत्तीतलावाचे सुशोभिकरण व या मार्गावरील रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात यावे. अक्कलकोट नगरपरिषदेकडून व्यापारी संकुलनाचे भाडेपट्टा व अनामत रक्कम मोठा प्रमाणात असल्याने याला मागणी नाही. यामुळे अनेक दुकाने ही पडून आहेत. तरी त्यांचे भाडेपट्टा व अनामत रक्कम कमी व्हावेत. महाराष्ट्र शासनाचे कृषी महाविद्यााय सुरु व्हावे. अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाचे अपग्रेड होऊन उपजिल्हा रुग्णालयााची उभारणी करणे व करजगी येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे.
अक्कलकोट नगरपरिषदेला 100 वर्षापूर्वीचा इतिहास असून अद्यापही जून्या इमारतीत प्रशासकीय कामकाज सुरु आहे. तरी शहराची लोकसंख्या व तरगंती लोकसंख्या आणि पुढील 30 वर्षाचा विचार करता 100 कोटी रुपयांचे अद्यावत प्रशासकीय सेवाभवन व व्यापारी संकुलनास मंजूरी मिळावी.
मैंदर्गी- दुधनी नगरपरिषद असून या शहराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा. श्रीक्षेत्र अक्कलकोट तीर्थक्षेत्रात आजुबाजुच्या 10 कि. मी. अंतरावरील गावांचा समावेश करण्यात यावे.
पालखी मार्गाचे रुंदीकरण करावेत. अक्कलकोट संस्थानकालीन इतिहास मोठा आहे. त्याकाळातील पाणी योजना आजही चालु आहे. संस्थानकालीन शस्त्रागार हे अशिया खंडातील सर्वात मोठे आहे. राज्याच्या पुरातन विभागाच्या विविध योजनांना व एकरुख योजनेस अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले असे नाव द्यावे. अक्कलकोट तालुका कृषी विभागाकडे महाराष्ट्र शासन याच्ंयाकडे सुमारे 100 एकराची जागा श्रीक्षेत्र अक्कलकोट नजीक असून कृषी अंतर्गत शेतकरी हितार्थ या ठिकाणी संशोानात्मक अशी योजना राबवावी.
अक्कलकोट तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती पाहता राज्य विद्युत कंपनीचे कार्यकारी अभियंता कार्यालय सुरु करावेत. स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात यावा. वळसंग येथे स्मारक व्हावे. बोरामणी विमानतळ येथे भूमीपूत्रांना कामाकरीता समावून यावे. व वळसंग, दक्षिण सोलापूर भागात काही सिमेंट फॅक्टरी आहेत येथे कामाकरीता भूमीपूत्रांना समावून घ्यावेत. अक्कलकोट रोड रेल्वेस्थानक येथे पर्यटन विकास महामंडळाचे रेस्टहाऊस उभे रहावेत. नागणसूर, तोळणूर येथे मोठे उद्योग उभा रहावेत. हन्नूरगावचे पूर्नवसन व्हावे. धुबधुबी योजना, जैनापूर शिरवळ, ता. दक्षिण सोलापूरचे सिंचन कालवा योजना सुरू करावेत. बासालेगांव व मैंदगी रोड परिसराकरीता नवीन ग्रामपाांयत व्हावी. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांना व ग्रामस्थांना त्वरीत नुकसान भरपाई देण्यात यावी. कोरोनावर लवकरच लस उपलब्ध होवून ती लोकापर्यंत पोहोचावी अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांना देण्यात आले.
यावेळी तालुका प्रमुख संजय देशमुख, शहर प्रमुख योगेश पवार, उपप्रमुख प्रा.सुर्यकांत कडबगांवकर, प्रविण घाटगे यांच्यासह महिला आघाडी, शिवसैनिक उपस्थित होते.